TMC Mahua Moitra Saam Digital
देश विदेश

TMC Mahua Moitra: लॉगिनसाठी ओटीपीही लागतो... तो फक्त माझ्या फोनवरच येतो, हिरानंदानी यांच्या नाही: खासदार महुआ मोइत्रा

TMC Mahua Moitra: लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा अडचणीत आल्या आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रमोद जगताप

TMC Mahua Moitra

लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा अडचणीत आल्या आहेत. त्यातच त्यांनी लॉगिन आयडी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडे दिल्याचे मान्य केले आहे.

या सगळ्या प्रकरणावर बोलताना महुआ मोइत्रा यांनी लॉगीन आणि पासवर्ड ने फक्त लॉगिन होत नाही. यासाठी ओटीपी लागतो, तो फक्त माझ्या फोनवर येतो… हा पासवर्ड दर्शन हिरानंदानी यांच्याकडे नाही जात. जेव्हा मी ओटीपी देते तेव्हाच प्रश्न टाकले जातात आणि असा कुठलाही नियम नाही कोणी लॉगीन केले पाहिजे. प्रत्येक खासदारांचे प्रश्न त्यांच्या टीमला दिले जातात. मी प्रश्न विचारण्याच्या बदल्यात कुठलेही पैसे घेतले नाही. असं महुआ मोइत्रा यांनी स्पष्ट केलं.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात लोकसभेत आवाज उठवणाऱ्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तसं पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं होतं. ज्यांच्याकडून मोइत्रा यांनी लाच घेतली असा आरोप होता ते उद्योगपती दर्शन हिरानंदानी या प्रकरणात माफीचे साक्षीदार झाले आहेत. मोईत्रा यांना महागडे गिफ्ट दिल्याचं हिरानंदानी यांनी कबूल केले आहे. मोईत्रा यांनी ब्लॅकमेल केल्याचाही आरोप हिरानंदानी यांनी माफीनाम्यात कबूल केला आहे. मोईत्रा यांनी या प्रकरणात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मागणी काय आहे?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन करण्याची आणि त्यांना सभागृहातून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. महुआ मोइत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा भाजपचा आरोप आहे. रोख रक्कम आणि भेटवस्तूंच्या बदल्यात हा प्रकार झाल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

हिरानंदानी यांच्या माफीनाम्यानंतर महुआ मोइत्रा काय म्हणाल्या?

हिरानंदानी यांना अद्याप सीबीआय किंवा इथिक्स कमिटीने चौकशीला बोलावलेले नाही. मग हिरानंदांनी यांनी हा माफीनामा कोणाला दिला?. मला बदनाम करण्यासाठी पीएमओतील काही कमी बुद्धीमान लोकांनी हा प्लॅन तयार केला आहे. हिरानंदानी यांनी दिलेला माफीनामा हा कुठल्याही ऑफिशीयल लेटरहेडवर नाही किंवा नोटरी पेपरवरही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट, २०२९ लोकसभेआधी कर्मचार्‍यांचा पगार वाढणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

Pune Accident News : १५ गाड्या चिरडल्या, ८ जणांचा होरपळून गेला जीव, १५ जण जखमी; दुर्घटनेतील मृतांची अन् जखमींची नावे आली समोर

Delhi Blast: सिरीयल स्फोटाचा कट उधळला, दहशतवाद्यांच्या टार्गेटवर 4 शहर; 32 गाड्यांमध्ये विध्वंसक बॉम्ब?

Eyelashes Care: खोट्या पापण्या वापरणं करा बंद; फक्त या घरगुती सामग्रीच्या तेलाने पुन्हा जाड आणि लांब होतील पापण्या

SCROLL FOR NEXT