Mahua Moitra ANI
देश विदेश

Mahua Moitra: महुआ मोईत्रांना दिलासा! जय अनंत देहाद्राई यांनी मागे घेतला मानहानीचा खटला

TMC Leader Mahua Moitra: वकील जय अनंत देहाद्राई यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील मानहानीचा खटला मागे घेतलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

TMC Leader Mahua Moitra: नवी दिल्ली:

लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा दिलासा मिळालाय. वकील जय अनंत देहाद्राई यांनी महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील मानहानीचा खटला मागे घेतलाय. 'लाईव्ह लॉ'ने दिलेल्या बातमीनुसार, वकील जय अनंत देहाद्राई यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये यासंदर्भात अर्ज करत मानहानीचा खटला मागे घेत असल्याचं म्हटलंय.

महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये देहाद्राई यांच्या खासगी आणि व्यावसायिक कामाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर देहाद्राई यांनी महुआ मोईत्रा यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

महुआ मोईत्रा यांची प्रश्नांच्या बदल्यात गिफ्ट घेतल्याप्रकरणी खासदारकी गेलीय. त्याचदरम्यान महुआ मोईत्रा यांनी देहाद्राई यांच्यावर टीका केली होती. यासर्व प्रकरणामध्ये देहाद्राई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह मजूकर हटवण्यात, यावा अशी मागणी त्यांनी केली होती.

संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्या आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे केला होता. प्रश्न विचारण्याप्रकरणी दुबे यांनी याची तक्रार लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मोईत्रा यांनीदेखील देहाद्राई आणि दुबे यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. परंतु मोईत्रा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली होती. मोईत्रा यांनी आपला संसदेचा लॉगईन दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT