West Bengal Saam Tv
देश विदेश

बंगाल विधानसभेत राडा; टीएमसी आणि भाजप आमदारात हाणामारी

पश्चिम बंगाल विधानसभेत बीरभूम हत्याकांडावर ममता बॅनर्जी सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

साम वृत्तसंथा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे ममता बॅनर्जी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यातील लढत विधानसभेपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी बंगाल विधानसभेत भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या भांडणात भाजप आमदार असित मजुमदार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी टीएमसी सरकारवर आरोप केले. राज्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी बोलण्यास सुरुवात केली.

विरोधी पक्षनेत्याच्या भाषणादरम्यान टीएमसीने गोंधळ सुरू केला. दुसरीकडे भाजप आमदारांनीही घोषणाबाजी सुरू केली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी व घोषणाबाजी झाली. आमदार जागेवरून उठून वेलमध्ये आले. ते एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

यावेळी विरोधकांनी कागदाचे तुकडे फाडून सभापती यांच्यावर टाकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घंटानाद करून घोषणाबाजी व मारहाणहा झाल्याचा आरोप आहे. यावेळी आमदार नरहरी महतो खाली पडले. आपले कपडे फाडून मारहाण केल्याचा आरोप भाजप आमदार मनोज तिग्गा यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP)आमदार असित मजुमदार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT