देश विदेश

Tirupati Laddu Controversy: 'नायडू हे खोटे बोलणारे, राजकारणासाठी श्रद्धेशी खेळतायत', लाडूच्या वादावर जगन यांचं पंतप्रधानांना पत्र

Tirupati Laddu Controversy: पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं की, 'चंद्रबाबू नायडू हे नेहमीचे खोटे बोलणारे आहेत. आता ते राजकीय हेतूसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळत आहेत.

Bharat Jadhav

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूवरून वाद सुरू झालाय.या विवादात आता पंतप्रधान मोदींची एन्ट्री होणार आहे. आंध्र प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या वादावरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर तिरुमला तिरुपती देवस्थानमची पवित्रता, अखंडता आणि प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोप करण्यात आलाय.

'चंद्राबाबू नायडू हे नेहमी खोटे बोलणारे आहेत. आता ते राजकीय हेतूसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळत असून त्याला ठेच लावलीय. खोट्या गोष्टी पसरवण्याच्या निर्लज्ज कृत्याबद्दल नायडूंना कडक शब्दात फटकारले पाहिजे. तसेच सत्य बाहेर आणणे गरजेचे असल्याचं रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. सीएम नायडूंनी कोट्यवधी हिंदू भाविकांच्या मनात जी शंका निर्माण केली आहे. जर त्यांना कडक शब्दात सुनावल्यानंतर आणि सत्य बाहेर आल्यानंतर ही शंका दूर होईल. तसेच TTD च्या पावित्र्यावरील लोकांचा विश्वास पुन्हा स्थापित केला जाईल, असं जगन मोहन रेड्डी या पत्रात म्हणालेत.

कथित भेसळयुक्त तूप नाकारण्यात आलं होतं, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्याला टीटीडीच्या आवारात प्रवेश दिला गेला नाही. परंतु नायडू यांनी १८ सप्टेंबर रोजी राजकीय पक्षाच्या बैठकीत दुर्भावनापूर्ण हेतूने हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत टीडीपी सर्वेसर्वा असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला होता की मागील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने श्री. व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादासाठी बनवण्यात येणाऱ्या लाडूमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरली गेली होती.

प्रसादबाबत सीएम नायडूंचा दावा काय?

राज्यातील मागील सरकारने तिरुपती येथील श्री. व्यंकटेश स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्याची चरबी वापरली जात होती, असा दावा चंद्राबाबू नायदू यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. हा दावा नायडून यांनी शनिवारी केला होता. तिरुपती लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ केल्याच्या आरोपानंतर सरकार संत, पुजारी आणि हिंदू धर्मातील इतर शीर्ष तज्ञांची चर्चा करणार आहे. त्यानंतर सरकार तिरुपती येथील जगप्रसिद्ध श्री. व्यंकटेश्वर स्वामी मंदिराबाबत निर्णय घेईल.

जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधातही तक्रार दाखल

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच त्यांनी TTD कार्यकारी अधिकाऱ्यांना तिरुमला पूर्णपणे पवित्र करण्याचे निर्देश दिलेत. काही पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यासह लाडूंचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री नायडू यांनी दिलीय. चांगल्या लाडूंसाठी आम्ही पुन्हा नंदिनीकडून तूप खरेदी करायला सुरुवात केलीय. भेसळीच्या आरोपानंतर जगन मोहन रेड्डी आणि इतरांविरुद्ध हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कारची दुचाकीला धडक, मोटारसायकल स्वारला लांबपर्यंत नेलं फरफटत, दिवेआगरमधील घटना

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT