भोपाळ : (Panna Tiger Reserve) मध्य प्रदेशचे पन्ना व्याघ्र प्रकल्प संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मात्र या व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासात आज पहिल्यांदाच एक दुःखद आणि धक्कादायक घटना घडली. सोमवारी सकाळी पन्ना व्याघ्र प्रकल्पातील हिनौता परिसरात चारा तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांपैकी एका महिलेवर वाघाने हल्ला केला. मृत्यूच्या घटनेनंतर व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या हिनौता गावातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास चार महिला व्याघ्र प्रकल्पात नेहमीप्रमाणे चारा तोडण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, अचानक महिलांना त्यांच्यासमोर तीन वाघ दिसले.
वाघाला पाहताच सर्व महिलांनी पळ काढला, मात्र एका महिलेवर तीन वाघांनी हल्ला करून तिला जंगलाच्या दिशेने ओढले. फुलिया साहू असे महिलेचे नाव आहे. त्यांना वाघाने तोंडात पकडून जंगलात नेल्याचे एका महिलेने सांगितले. आम्ही तीन वाघ पाहिले असे इतर महिलांनी सांगितले. पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघाने मानवावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. व्याघ्र अभयारण्य व्यवस्थापन वाघांवर हत्तींच्या सहाय्याने लक्ष ठेवून चिन्हांकित करत आहे.
गावात वाघाची दहशत
पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघाने माणसावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. हत्तींच्या सहाय्याने वाघांचे निरीक्षण करून त्यांना चिन्हांकित केले जात आहे. 652 वाघिणीच्या पिल्लांनी महिलेला आपला बळी बनवल्याचं सांगण्यात येत आहे. हत्तींच्या मदतीने महिलेचा मृतदेह वाघापासून वाचवण्यात आला. वाघांनी महिलेचे डोके आणि तिचे दोन्ही हात व पाय खाऊन टाकले होते. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक सांगतात की, पूर्वी वाघ घरात बांधलेल्या गुरांना लक्ष्य करायचे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही कोणीही कारवाई केली नाही. आता वाघांनीही माणसांना आपली शिकार बनवायला सुरुवात केली आहे.
तीन वाघांनी केली एका महिलेची शिकार
वाघ नरभक्षक झाल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. एकाच वेळी तीन वाघांनी महिलेला आपला बळी बनवले. वाघाने मानवांवर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. धोका लक्षात घेऊन व्यवस्थापनाने उद्यानात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. याशिवाय व्यवस्थापनाने वाघाची ओळख पटवून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.