Tibet Earthquake News  AI Image
देश विदेश

Earthquake : मध्यरात्री ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप,४ तासांत १३ वेळा धक्के; १६ जणांचा मृत्यूने हाहाकार

Tibet Earthquake Update News : तिबेटमध्ये ७ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे १६ जणांचा मृत्यू आणि ३३९ घरांचे नुकसान झाल्याची माहिती. अवघ्या चार तासांत १३ धक्के जाणवले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

Alisha Khedekar

  • तिबेटमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठे नुकसान

  • भूकंपात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

  • ३३९ घरे कोसळली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू

  • भूकंपानंतर अवघ्या चार तासांत १३ वेळा धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले

  • चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले

तिबेटमध्ये गुरुवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. ७ रिश्टर भूकंपामुळे परिसरातील अनेक भागांचे नुकसान झाले असून, आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपानंतर अवघ्या चार तासांत तिबेटमध्ये १३ वेळा धक्के जाणवले. चीनसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या भागांमध्ये मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिबेटमधील या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी सोबतच वित्त हानी झाली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या आपत्तीमध्ये ३३९ घरे कोसळली आहेत. ही घरे कोसळून ठिकठिकाणी ढीगच्या ढीग जमा झाला आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले असून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावित भागांतील नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे.

भूकंपाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने शिजांग परिसरात तिसऱ्या स्तरावरील आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. मदतकार्यासाठी ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि ३४७ बचाव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाधित बाछेन काउंटीमध्ये आवश्यक मदतसाहित्य पोहोचवले जात असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र तिबेटमधील नागकू शहराच्या परिसरात, राजधानी ल्हासापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री ८.४२, ९.०९, ९.१५, ९.४७, ९.५१, १०.२०, १०.२८, १०.४०, ११.१७, ११.३६ आणि ११.५५ वाजता तसेच मध्यरात्री १२.०१ वाजता धक्के नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

Fort : भव्य राजवाडे अन् अप्रतिम सौंदर्य; दिवाळीत करा किल्ल्यावर भटकंती, 'हे' लोकेशन आहे खूपच खास

Famous Actor Death : चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा निखळला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, चाहत्यांना धक्का

MLC Election: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतदान, १८२ उमेदवार रिंगणात; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT