Rajasthan Barmer Fire  Saam Tv
देश विदेश

Barmer News : शेतातील झोपडीला अचानक आग, आईच्या डोळ्यासमोरच तीन मुलं होरपळली; मन सुन्न करणारी घटना

लहानग्या मुलांना एकटं सोडून मजुरीला जाणं एका आईला आभाळाएवढं दु:ख देऊन गेलं.

Satish Daud

Rajasthan Barmer Fire News : लहानग्या मुलांना एकटं सोडून मजुरीला जाणं एका आईला आभाळाएवढं दु:ख देऊन गेलं. शेतात बांधलेल्या गवताच्या झोपडीला अचानक आग लागली. या आगीत झोपडीत खेळत असलेल्या तीन चिमुकल्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिण भावांचा समावेश असून त्यांच्याच कुटुंबातील आणखी एक मुलगी सुद्धा जीवास मुकली आहे.  (Latest Marathi News)

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील वांद्रे गावात बुधवारी दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे मृत मुलांच्या मजूर आईला जबर धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सरूपी सिंह (वय ४ वर्ष) अशोक सिंह (वय २ वर्ष), रुकमा सिंह ( वय ७ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. बुधवारी ते गावातील एका व्यक्तीच्या शेतात मजुरीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं आणि कुटुंबातील एका व्यक्तीची एक चिमुकली मुलगी सुद्धा होती. उन्हाच्या झळा लागत असल्याने आईने या मुलांना शेतातील गवताच्या झोपडीत बसून दिलं.

दुपारच्या सुमारास मुलं झोपडीत खेळत असताना, अचानक झोपडीला आग (Fire) लागली. बघता-बघता या आगीने रौद्ररुप धारण केलं. झोपडीपासून दूर असलेल्या मुलांच्या आई-वडीलांना ही आग दिसली. मात्र, ते येण्याच्या आधीच झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोटच्या गोळ्यांना आपल्या डोळ्यादेखत होरपळताना बघून आईसह वडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवले. मृतांमध्ये दोन निष्पाप मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. यातील दोन मुले खरे भाऊ-बहीण होते.

ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, प्राथामिक माहितीनुसार, यातील एका मुलाने झोपडीत असलेली आग पेटी पेटवली. त्यामुळे झोपडीला आग लागली. आग लागल्यानंतर मुलांना बाहेर पडता आले नाही. मन सुन्न करणाऱ्या या घटनेनं गावातील ग्रामस्थांना देखील अश्रू अनावर झालेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी, पक्षात काय घडतयं?

SCROLL FOR NEXT