धोका वाढला! डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन वेगवेगळे प्रकार Saam Tv
देश विदेश

धोका वाढला! डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन वेगवेगळे प्रकार

तज्ज्ञांच्या चिंतेत भर

वृत्तसंस्था

मुंबई - एकीकडे राज्यातील कोरोनाचा Corona या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत तर दुसरीकडे डेल्टा प्लस Delta Plus व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट समूहाच्या 3 वेगवेगळ्या विषाणूंनी आता तज्ज्ञांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे.

हे देखील पहा -

राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे एकूण 66 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार असून त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावे देण्यात आली आहे. डेल्टा व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याने डेल्टा प्लसची निर्मिती झाली. आता डेल्टाच्या स्पाईक प्रथिनेमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये तयार झाला आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 66 रुग्ण सापडले आहेत. यातील 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या रुग्णांपैकी काही लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्याच्या विविध भागातील रुग्णांचे नमुने घेऊन जिनॉम सिक्वन्सिंग करण्यात येत असून त्यातूनच ही माहिती समोर आली. उत्तर महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक13 रुग्ण आहेत. त्यानंतर रत्नागिरीमध्ये 12 आणि मुंबईमध्ये 11 रुग्ण आहेत. पूर्व मुंबईत एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर रायगड जिल्ह्यात सुद्धा गेल्या महिन्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT