Haryana Accident News Saam Tv
देश विदेश

भीषण अपघात; फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले, 3 ठार

हरियाणाच्या झज्जरमधून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हरियाणा: हरियाणाच्या (Haryana) झज्जरमधून एक भीषण अपघाताची (Terrible accident) माहिती समोर आली आहे. एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना (laborers) चिरडले आहे. यामध्ये ३ मजुरांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील (district) टोल प्लाझासमोर कुंडली- मानेसर- पलवल एक्स्प्रेसवेवर (expressway) हा भीषण अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

हे देखील पाहा-

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने, तो रस्त्यावरून फुटपाथवर गेला. या फुटपाथवर अनेक मजूर झोपले होते. यावेळी हा ट्रक या मजुरांना चिरडत पुढे निघून गेला व उलटला आहे. यामध्ये फुटपाथवर ३ मजुरांचा जीव गेला तर ११ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, १० जखमींना पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे, तर एका जखमी मजुराला बहादुरगडमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर या एक्स्प्रेस वेवर दुरुस्तीचे काम करण्यासाठी या ठिकाणी आले होते. काम संपल्यावर सर्वजण थकून रस्त्याच्या कडेलाच झोपले होते. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT