हुश्श! चालला एकदाचा; अखेर परतीच्या पाऊस झाला सुरु Saam TV
देश विदेश

हुश्श! चालला एकदाचा; अखेर परतीचा पाऊस झाला सुरु

पावसाचा परतीचा प्रवास अखेर सुरू झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थान, गुजरातच्या भागातून आजपासून सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

वृत्तसंस्था

पावसाचा परतीचा प्रवास अखेर सुरू झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थान, गुजरातच्या भागातून आजपासून सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 6 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून 30 सप्टेंबरला सांगण्यात आलं होते. 1 जूनला पावसाला सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत देशभरात 99 टक्के पाऊस झाला आहे.

गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशच्या अनेक भागातून मान्सूनच्या परतीसाठी पुढील 24 तास अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी सांगितले आहे. होसळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं यापूर्वीच सांगितलं होतं. यंदाचा नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला असून 30 सप्टेंबरला पुर्ण झाला. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पाऊस पडला आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : रात्रभर पंखा चालू ठेवून झोपताय? आजच बदला 'ही' सवय, शरीराचे होतेय गंभीर नुकसान

Maharashtra News Live Update: दुष्काळ निवारणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून निधी उभारण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आवाहन

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT