The power crisis is serious Saam TV
देश विदेश

देशात विजेचे संकट गंभीर; तब्बल इतक्या वर्षांनी करावी लागतेय कोळशाची आयात

उन्हाळ्यामुळे वाढलेल्या विजेच्या वापरामुळे आता देशभरातील विजेचे संकट अधिकचं गडद होत चाललं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सध्या देशभरात उन्हाच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे वाढलेल्या या विजेच्या वापरामुळे आता देशभरातील विजेचे संकट (Power Crisis) अधिकचं गडद होत चाललं आहे. त्यामुळेच जवळपास ७ वर्षांनी कोल इंडिया (Coal India) या सरकारी कंपनीने कोळसा आयात केला आहे. याआधी २०१५ साली या कंपनीने आयात केला होता त्यानंतर आता कंपनीवर कोळसा आयात करण्याची वेळी आली आहे.

दरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या (Ministry of Energy) म्हणण्यानुसार, सरकारी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह, स्वतंत्र वीज उत्पादकांना आयात केलेल्या कोळशाचा पुरवठा केला जाईल. तंसच वीज खरेदी कराराद्वारे (PPA) वीज निर्मितीचा वाढलेला खर्च वसूल करण्यासाठी केंद्राने औष्णिक प्रकल्पांना परदेशातून कोळसा आयात करून वीज निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे.

हे देखील पाहा -

जरी केंद्राने औष्णिक प्रकल्पांना (Thermal Projects) परदेशातून कोळसा आयात करून वीज निर्मिती करण्यास परवानगी दिली असली तरी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कोळशाच्या किमती लाढल्या आहेत. अशात देशात वीजपुरवठा (Power supply) सुरळीत होण्यासाठी कोळसा आयात करणे हे अत्यंत महत्त्वाचं असताना सरकारने थर्मल प्लांटच्या किमती लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे.

अदानी ग्रीन एनर्जीची (Adani Green Energy) उपकंपनी असलेल्या अदानी हायब्रीड एनर्जीने राजस्थानमधील जैसलमेर येथे ३९० मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू केला आहे. हा देशातील पहिला विंड सोलर हायब्रिड ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.

अदानी ग्रीनचे CEO व्हिएनीज जैन यांनी सांगितलं की, विंड सोलर हायब्रिड ऊर्जा हा आमच्या व्यवसाय धोरणाचा मुख्य भाग आहे. भारताची वाढती हरित ऊर्जेची गरज पूर्ण करणे हा त्याचा उद्देश असून या संयंत्राने भारतीय सौर ऊर्जा महामंडळासोबत २.६९ रुपये प्रति किलोवॅट दराने वीज खरेदी करार झाला असून तो राष्ट्रीय सरासरी वीज खरेदी खर्चापेक्षा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT