RBI Cardless Withdrawals Rule
RBI Cardless Withdrawals Rule Saam Tv
देश विदेश

ATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, तुमच्या फायद्यासाठी RBI ने लागू केला हा नियम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: डिजिटल व्यवहारांच्या युगात एटीएममधून (ATM) पैसे काढणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पण जर तुम्ही अनेकदा एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बँका आणि एटीएम ऑपरेटरना एटीएममधून कार्डलेस पैसे काढण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयचा (RBI) हा नियम लागू झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. याचा फायदा असा होईल, की कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होणार आहे.

हे देखील पाहा-

कार्डलेस व्यवहारात पैसे काढण्यासाठी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डची (Credit card) गरज भासणार नाही.यामध्ये तुम्ही पेटीएम, गुगल पे, अॅमेझॉन पे (Amazon Pay) किंवा फोनपे सारख्या UPI पेमेंट अॅप्सद्वारेच एटीएममधून पैसे काढू शकाणार आहात. आरबीआयच्या सूचनेनंतर आता सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटरना कार्डलेस कॅश काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नियमांनुसार कोणतीही बँक कोणत्याही बँकेच्या खातेदाराला ही सुविधा देऊ शकते.

यासाठी NPCI ला UPI इंटिग्रेशनच्या सूचना मिळाल्या आहेत. एटीएम कार्डवर सध्या आकारले जाणारे शुल्क बदलानंतरही तेच राहणार आहे. यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. याशिवाय, कॅशलेस व्यवहारातून पैसे काढण्याची मर्यादा देखील पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. कार्डलेस व्यवहाराची सुविधा सध्या फक्त काही बँकांच्या एटीएममध्ये उपलब्ध आहे. नवीन नियमांनुसार, ग्राहकाला यापुढे एटीएममध्ये डेबिट कार्ड टाकण्याची गरज नाही.

यासाठी ग्राहकाला एटीएममध्ये क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर ६ अंकी UPI टाकल्यानंतर पैसे बाहेर येणार आहेत. कॅशलेस कॅश काढण्याची प्रणाली लागू करण्यामागील RBI चा उद्देश वाढत्या फसवणुकीच्या घटना कमी करणे हा आहे. यामुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, पैसे काढण्यासाठी तुम्हाला कार्डची गरज भासणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT