Radhika Gupta Saam Tv
देश विदेश

'त्यावेळी आत्महत्या करणार होते, पण; भारताची युवा CEO राधिका गुप्ता यांची कहाणी

एडलवाईस ग्लोबल अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राधिका गुप्ता यांनी सांगितले की, लहान वयातच तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली. भारतातील सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असलेल्या एडलवाईस एमएफच्या (Edelweiss Asset Management Limited) सीईओ राधिका गुप्ता यांची कहाणी खूपच प्रेरणादायक आहे. आपली वाकडी मान आणि बोलण्याच्या भारतीय उच्चारामुळे राधिका यांना शाळेत अन् कॉलेजनंतरही त्यांचं हसं केलं जात होत. एकदा तर, नोकरी न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. पण सुदैवाने त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवले. पण एकदा नोकरी मिळाल्यानंतर राधिकाने मागे वळून पाहिले नाही आणि वयाच्या ३३ व्या वर्षी त्या सीईओ बनल्या.

वृत्तानुसार राधिका गुप्ताने ह्युमन ऑफ बॉम्बेला सांगितले की, त्यांचे वडील राजनयिक होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नायजेरियामध्ये झाले. नायजेरियातील त्यांचे वर्गमित्र त्याच्या वाकड्या मानेबद्दल आणि भारतीय उच्चारामुळे त्याची चेष्टा करायचे आणि त्यांना अप्पू म्हणत.

राधिका म्हणाल्या की, माझी नेहमी माझ्या आईशी तुलना केली जायची, जी माझ्याच शाळेत शिकवते. माझी आई एक अतिशय सुंदर स्त्री आहे. लोक नेहमी माझी तुलना माझ्या आईशी करतात आणि म्हणतात की तू तिच्या तुलनेत खूप कुरूप दिसतेस. त्यामुळे माझ्या आत्मविश्वास ढासळत असे."

मुलाखतीत नापास झाल्यास आत्महत्येचा प्रयत्न केला;

वयाच्या 22 व्या वर्षी राधिकाला कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही. 7 व्या नोकरीच्या मुलाखतीत नापास झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. राधिका म्हणाल्या, “मी खिडकीतून बाहेर बघत होते आणि उडी मारणारच होते तेव्हा माझ्या मित्रांनी मला वाचवले. त्यानंतर ते मला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले." मनोरुग्णालयात माझ्या डिप्रेशनवर उपचार करण्यात आल्याचे राधिका यांनी सांगितले. 'मला नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचे असल्याचे सांगितल्यावरच त्यांनी मला वॉर्डातून डिस्चार्ज दिला, असे राधिका यांनी सांगितले. राधिका मुलाखतीसाठी गेली होती. या मुलाखतीत त्या पास झाल्या आणि त्यांना मॅकेन्झीमध्ये नोकरी मिळाली.

राधिका म्हणाल्या, 'यामुळे माझे आयुष्य पुन्हा रुळावर आले खरे, पण तीन वर्षानंतरच मी आयुष्यात काही बदल करायचे ठरवले.' वयाच्या 25 व्या वर्षी त्या भारतात परतल्या. त्यांनी पती आणि मित्रांसोबत स्वतःची मालमत्ता व्यवस्थापन फर्म (Management Firm) सुरू करण्यासाठी काम केले. काही वर्षांनंतर, त्यांची कंपनी एडलवाईस एमएफने विकत घेतली. राधिका म्हणाल्या, “मी यशस्वी होऊ लागले होते. आता संधींकडे हात पुढे करायचा होता. म्हणून जेव्हा एडलवाईसने सीईओ शोधायला सुरुवात केली तेव्हा मीही माझ्या पतीच्या प्रेरणेने आणि कसलाही संकोच न करता या पदासाठी अर्ज केला.” काही महिन्यांनंतर, एडलवाईसने राधिकोची सीईओ म्हणून निवड केली. अन् वयाच्या ३३ व्या वर्षी त्या सीईओ बनल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT