Top 5 Indian Horror Web Series: OTT प्लॅटफॉर्म प्रेक्षकांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण आहे. आज वेब सिरीजचे (Web Series) जग आहे. इथे प्रेक्षकांना खूप रोमान्स, अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळतो. त्याच वेळी, जेव्हा हॉरर वेब सिरीजचा विचार केला जातो, तेव्हा प्रेक्षकांकडे यासाठी OTT वर देखील कमी पर्याय नाहीत. आज तुमच्यासाठी टॉप 5 इंडियन हॉरर वेबची यादी सांगणार आहोत.
गेहेराईया;
ही हॉरर वेब सिरीज 'रेना कपूर' या मुलीची कथा आहे जी एक सर्जन आहे. ही व्यक्तिरेखा संजीदा शेखने साकारली आहे. रेनाला तिच्या भूतकाळातील काहीतरी गोष्ट सतावत असते. या मालिकेत भीतीसोबतच तुम्हाला खूप सस्पेन्सही पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे निर्माते विक्रम भट्ट आहेत. हे तुम्ही Voot Select (Voot App) वर पाहू शकता.
Gehraiyaan Official Trailer-
भ्रम-
भ्रम ही एक सायको हॉरर थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्यामध्ये कल्की कोचलिन PTSD पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने पीडित मुलीची भूमिका साकारत आहे. कल्की नेहमी एक मुलगी पाहत असते. सुरुवातीला तिला वाटले की हा फक्त तिचा भ्रम आहे, परंतु नंतर तिला कळले की ती मुलगी 20 वर्षांपूर्वीच मेली आहे. ही मालिका तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
Bhram Official Trailer-
टाइपराइटर-
टाइपराइटर एक उत्तम भयपट वेब सिरीज आहे. ५ भागांच्या या मालिकेत एका तरुण मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. त्यांच्या शेजारी एक बंगला आहे. या सिरीजमध्ये शेवटी ट्विस्ट पाहायला मिळतो. तुम्हीही एखादी चांगली हिंदी हॉरर वेब सिरीज शोधत असाल तर ती नक्की पहा.
Typewriter Official Trailer-
घोल-
राधिका आपटे स्टारर घोल ही एक विलक्षण भारतीय हॉरर वेब सीरिज आहे जी एका विचित्र कैद्यापासून सुरू होते. यानंतर लष्करी लोकांसोबत असामान्य घटना घडू लागतात. या मालिकेचे फक्त तीन भाग आहेत, परंतु ते सर्वांना घाबरवतात.
Ghoul Official Trailer-
परछाई;
तुम्हालाही एखादी उत्तम हॉरर मालिका बघायची असेल, तर तुम्ही तुमच्या यादीत 'परछाई'चा समावेश करू शकता. ही मालिका रस्किन बाँडच्या भयकथांवर बनलेली आहे, ज्यामध्ये १२ लघु भयकथा आहेत. तुम्ही ते Zee 5 वर घरी बसून पाहू शकता.
Parchhayee: Ghost Stories by Ruskin Bond Trailer-
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.