बाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे काही तासात बदलले नशीब
बाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे काही तासात बदलले नशीब ANI/ Saam TV
देश विदेश

बाजारात मटण आणायला गेला आणि 12 कोटींचा मालक झाला; 72 वर्षाच्या पेंटरचे काही तासात बदलले नशीब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केरळ : आपण प्रत्येकाला पैशांची खूप गरज असते त्यासाठी आपआपल्य़ा कामाच्या, धंद्याच्या ठिकाणी नवनवीन कल्पनांमधून आपण आपली आर्थिकस्थिती कशी सुधारु शकतो याचा विचार करतो. मात्र याच वेळी एखादा लॉटरी (Lottery) लावणारा अचानक कसा मोठा होता याचा आपण विचार करत असतो आणि आपल्याही मनात लॉटरीचा विचार येतो असाच विचार एका व्यक्तीला काही तासांमध्ये कोट्याधीश करुन गेला आहे.

हो आयुष्याची 72 वर्षे कष्ट करण्यात घालवली मात्र त्याला अचानक लॉटरी लागली तो व्यक्ती म्हणजे केरळमधील (Keral) कोट्टायम येथे राहणाऱ्या सदानंदन. सदानंदन याने काही तासांपूर्वी घतलेल्या लॉटरीच्या तिकीटामुळे आज तो 12 कोटींचा मालक बनला आहे.

कारण सदानंदन यांना 12 कोटींची बंपर लॉटरी सदानंद यांना लागली असून सदानंदन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही लॉटरी त्यांनी केरळ सरकारच्या ख्रिसमस New Year बंपर लॉटरीत जिंकली आहे. 50 वर्षांपासून सदानंदन पेंटिंगचे काम करत होते मात्र या लॉटरीने त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे.

केरळमधील कुदयमपाडी येथील रहिवासी असलेल्या सदानंदन यांनी सांगितले की, रविवारी सकाळी आपण बाजारातून मटण विकत घेण्यासाठी जात असताना सेल्वन नावाच्या तिकीट विक्रेत्याकडून मी लॉटरीचा ड्रॉ संपण्याच्या 5 तास आधी एका दुकानदाराकडून XG 218582 नंबरचे लॉटरी तिकीट खरेदी केले. हे तिकीट कोट्टायम शहरातील लॉटरी एजंट बिजी वर्गीस यांनी कुडेमपाडीजवळील पांडवम येथील लॉटरी विक्रेता कुन्नेपरंबिल सेल्वनला विकले.

हे तिकीट फक्त 300 रुपयांचे होते लॉटरीची दुसरी आणि तिसरी बक्षिसेही वितरीत करण्यात आली आहेत. द्वितीय पारितोषिक जिंकलेल्या 6 जणांना 3 कोटी रुपये तर तृतीय पारितोषिक जिंकणाऱ्या ६ भाग्यवान विजेत्यांना 60 लाख रुपये देण्यात आले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

SCROLL FOR NEXT