Corona: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 66 जणांचा मृत्यू Saam TV
देश विदेश

Corona: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 66 जणांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासामध्ये ४३६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ५४,११८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये ९,६२० लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. (The country recorded 4362 new corona patients last 24 hours killing 66 people)

हे देखील पहा-

याबरोबरच, बरे झालेल्या लोकांची संख्या ४,२३,९८,०९५ झाली आहे. कोरोना रुग्णांचा रोजच्या सकारात्मकता दर ०.७१ टक्के आहे. आतापर्यंत ७७.३४ कोटी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मागील २४ तासामध्ये ६,१२,९२६ कोरोना चाचण्या करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये आणखी २३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या ७,०८,४७९ वर पोहोचली आहे. आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही नवीन प्रकरणे समोर आली आहेत. मृतांची संख्या ११,८७७ आहे.

ठाण्यामध्ये कोविड-१९ मृत्यू दर १.६७ टक्के इतका आहे. दुसर्‍या अधिकाऱ्याने सांगितले की, शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड-१९ चे रुग्ण १,६३,४२३ वर पोहोचले आहेत तर मृतांची संख्या ३,३९२ इतकी आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Karanji Recipe : थंडीत आवर्जून बनवा खुसखुशीत मटार करंजी, खायला चवदार अन् करायला सोपी

Maharashtra Nagar Parishad Live : चंद्रपुरात मतदाराने ईव्हीएम फोडले

Young Stroke Causes: तरुण वयात स्ट्रोक होण्याची कारणं कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT