Gold Rate
Gold Rate Saam Tv
देश विदेश

सोने ३ महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात स्वस्त; जाणून घ्या १० ग्रॅमचा आजचा भाव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारातील मंदीमुळे बुधवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळी सोन्याचा फ्युचर्स भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. लग्नसराईच्या हंगामातही सोन्याचा भाव ५० हजारांच्या आसपास पोहोचला असून चांदीचे दर ६० हजारांच्या आसपास आहे.

हे देखील पाहा -

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, बुधवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत 228 रुपयांनी घसरून 50,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तीन महिन्यानंतर सोने आज सर्वात स्वस्त झाले आहे. आजच्या व्यवहारात सोने 50,445 रुपयांवर खुले झाले, परंतु मागणी कमी झाल्याने ते 0.45 टक्क्यांनी घसरून 50,358 वर आली.

चांदीच्या दरातही घसरण

चांदीचे दर 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. चांदीने आज 60,525 रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू केला, परंतु विक्री वाढल्याने त्याची किंमत लवकरच 0.46 टक्क्यांनी घसरून 60,338 वर आली.

अशी तपासता सोन्याची शुद्धता?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळेल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

SCROLL FOR NEXT