Viral Car Accident Video Saam Tv
देश विदेश

Viral Video: अपघात झाला की कार थेट आकाशातून पडली, विचित्र अपघात पाहून नेटकरीही चक्रावले

नुकताच सोशल मीडियावर एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला असेल याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे.

Shivani Tichkule

Viral Accident News: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे इतके भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. नुकताच सोशल मीडियावर एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला असेल याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. (Latest Marathi News)

व्हिडिओ पाहिल्यानंतर हा अपघात अतिशय भीषण असल्याचे स्पष्टपणे समजते. मात्र, अखेर हा अपघात कसा घडला असेल, या सारखे असंख्य प्रश्न निर्माण होतील. @ClownWorld_ Twitter अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओ पाहून तुमचेही डोक नक्कीच फिरेल. 

व्हिडीओमध्ये (Viral Video) पाहायला मिळत आहे की, अपघात (Accident) झालेली कार डायरेक्ट खांब्यावर कशी पडली. रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये खांब नेमका कसा घुसला याची कल्पना करणे कठीण आहे. ज्यांनी अपघात पाहिला आहे ते गाडीचं आजूबाजूनं निरीक्षण करीत आहेत. अनेकांनी कार आकाशातून पडली असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीचे अपघात क्वचित पाहायला मिळतात. (Viral News)

सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ आठ सेंकदाचा आहे, हा व्हिडीओ 5.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या घटनेवर लोकांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मला वाटत नाही की या घटनेत वेग हा घटक आहे. तर तिथे दुसऱ्या युजरने लिहिले, कोणीतरी हे वाइपर थांबवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT