लग्नातील मस्ती नवरदेव- नवरीला महागात पडली; स्टेजवर एंट्री करताना तुटली झुल्याची दोरी Saam Tv
देश विदेश

लग्नातील मस्ती नवरदेव- नवरीला महागात पडली; स्टेजवर एंट्री करताना तुटली झुल्याची दोरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या (marriage) कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. हॉटेलमध्ये लग्नाच्या स्टेजवर जाताना हार्नेस (Harness) तुटल्यामुळे वधू आणि वर दोघेही स्टेजवर कोसळले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर, इव्हेंट कंपनीने आपली चूक मान्य केली असून झालेल्या घटनेविषयी पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली नाही.

हे प्रकरण तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे. खरे तर, वधू- वरांना हार्नेसच्या माध्यमातून मंचावर आणले जात होते. मात्र, हार्नेस अचानक तुटल्यामुळे वधू- वर १२ फूट उंचीवरून खाली कोसळले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे देखील पहा-

केवळ वधू आणि वराला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पाहुण्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी आपला राग इव्हेंट कंपनीवर काढला. ही घटना तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली आहे. लग्नाच्या कार्यक्रमाची जबाबदारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आली होती. सर्व काही ठिक सुरू होते. लोक नाचण्याचा आणि खाण्याचा आनंद लुटत होते.

वधू आणि वराला गोल रिंगमधून हार्नेसच्या सहाय्याने खाली स्टेजवर उतरवले जात होते. लग्नात उपस्थित सर्वांच्या नजरा केवळ आकाशातून स्टेजवर उतरत असलेल्या वधू- वरांच्या एंट्रीवर होते. त्याचवेळी हार्नेस तुटला आणि वधू- वर धडकन खाली कोसळले आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला आणि आरडा- ओरड सुरू झाली. या घटनेनंतर, उपस्थित लोक प्रचंड संतापले होते आणि त्यांनी आपला राग इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर काढला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT