TVK chief vijay social media
देश विदेश

Tamil Nadu Politics : तमिळनाडूमध्ये पेच वाढला, TVK प्रमुख विजय यांचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, पण बहुमत कसं मिळवणार?

तमिळगा वेत्री कळघम (TVK party) प्रमुख थलापती विजय यांनी तमिळनाडूत नवं सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. विजय यांनी बुधवारी चेन्नईत राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली. मात्र, विजय यांच्या पक्षाकडे सरकार स्थापनेसाठी बहुमत नाही. त्यामुळे पेच वाढला आहे.

Nandkumar Joshi

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्ही पक्षाचे प्रमुख अभिनेते थलापती विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. विजय यांनी बुधवारी चेन्नईच्या गिंडी येथील लोकभवनात कार्यवाहक राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी विजय यांनी राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्याचा दावा केला. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे पेच वाढला आहे. दुसरीकडे अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर बहुमताची जुळवाजुळव झाल्यानंतरच विजय यांनी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असं मानलं जात आहे.

तमिळनाडूत नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. यात थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सर्वात मोठा विजय मिळवला. मात्र, कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडी-युतीला बहुमतासाठी आवश्यक ११८ चा जादुई आकडा गाठता आलेला नाही. निवडणूक निकालानुसार, विजय यांच्या नेतृत्वातील टीव्हीकेने १०८ जागांवर विजय मिळवला. तर डीएमके आघाडीला ७३, एआयएडीएमके आघाडीला ५३ जागांवर विजय मिळाला. याशिवाय काँग्रेसला पाच, पीएमके ४, आययूएमएल २, सीपीआय २, व्हीसीके २, सीपीआय एम २, भाजप, डीएमडीके, एएमएमके यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बहुमताअभावी राज्यात राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे टीव्हीकेने अन्य पक्षांशी आघाडी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तमिळनाडूत शपथ सोहळ्याची तयारी

तत्पूर्वी, तमिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. सेल्व्हापेरुंथगा आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी चेन्नईत टीव्हीकेच्या मुख्यालयात थलापती विजय यांची भेट घेतली. तमिळनाडू काँग्रेस कमिटी आणि विधीमंडळ पक्षाने सरकार स्थापन्यासाठी टीव्हीकेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे थलापती विजय हे उद्या, गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इंनडोअर स्टेडियममध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथ सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.

राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

टीव्हीके प्रमुख थलापती विजय यांनी आज, बुधवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय हे लोकभवनात गेले. त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा केला. विजय उद्या सकाळी १० ते ११.१५ वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी होईल.

पेच कुठे वाढला?

२३४ सदस्यसंख्या असलेल्या तमिळनाडूत बहुमतासाठी टीव्हीके पक्षाला ११८ आमदारांची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवला आहे. विजय यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आहे. अशात त्यांना एका जागेवर राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे विजय यांच्याकडे केवळ १०७ जागा आहेत. त्यांना अजून ११ आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी, त्यांच्याकडे पाच आमदार आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावर ही संख्या १११ वर जाणार आहे. मात्र, अजूनही बहुमतासाठी सात आमदारांची गरज आहे. त्यामुळे विजय यांना अन्य लहान पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, टीव्हीकेने काँग्रेससह डीएमकेचे मित्रपक्ष व्हीसीके, डावे पक्ष, इंडियन युनियन मुस्लीम लीग आदींचा पाठिंबा मागितला होता. काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर डावे पक्ष आणि आययूएमएलने पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. तर व्हीसीकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे टीव्हीकेच्या विजय यांच्यासमोर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी? चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT