Sanjay Raut On Nitin Desai Death Saam Tv
देश विदेश

Sanjay Raut On Nitin Desai Death: 'नितीन देसाईंची शेवटची ऑडिओ क्लिप समोर यायला हवी', संजय राऊतांची मागणी

नितीन देसाई यांच्या एन डी स्टुडिओला चित्रनगरीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

Priya More

Delhi News: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Marathi Art Director Nitin Desai ) यांनी आत्महत्या केली असल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या (Nitin Desai Death Case) केली. त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचे सांगितले जात आहे.

अशामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Thackeray Group Leader Sanjay Raut) यांनी नितीन देसाईंबाबत मोठे विधान केले आहे. नितीन देसाईंची आत्महत्येपूर्वीची शेवटची व्हाईस नोट समोर यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, नितीन देसाई यांच्या एन डी स्टुडिओला चित्रनगरीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ' नितीन देसाई यांच्यासारख्या एक हुन्नार कलादिग्दर्शक जाणे हे दुर्दैवी आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कतृत्वाचा ठसा कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी उमटवला. या देशातला सगळ्यात उत्तम असा एनडी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभा केला. 'लगान'पासून 'जोधा अकबर'पर्यंत अनेक चित्रपटातून त्यांची कला आपण पाहिली. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा महान कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू व्हावा. त्याला मृत्यूला कवटाळावे लागले हे दुर्दैवी आहे.'

'एका बाजूला या देशातून हजारो कोटी रुपये घेऊन लोकं पळत आहेत. बँकांना लुबाडत आहेत. भाजपच्या लोकांना कर्जमाफी केली जाते, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण एक हुन्नरी मराठी माणूस मात्र दीडशे कोटींचे कर्ज फेडू शकला नाही. 'जे स्वप्न एनडी स्टुडिओच्या माध्यमातून उभं केलं ते स्वप्न माझ्यासमोर मला विखुरताना दिसत आहे. कोणी तरी माझा स्टुडिओ जप्त करेल हे सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांची सुसाईड व्हाईस नोटमधील माहिती समोर आली पाहिजे.', अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

'देशाला आणि महाराष्ट्राला कळाले पाहिजे की अशाप्रकारच्या प्रामाणिक उद्योगपतींना सध्याच्या काळात कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. ते देश सोडून पळून गेले नाहीत त्यांनी कोणाला फसवले नाही हे महत्वाचे आहे. नितीन देसाईचे स्वप्न होतं ते मराठी माणसांचे स्वप्न होतं. नितीन देसाईंनी मागणी केली असे तर आमच्यासर्वांची तीच भावना आहे. सरकारने त्यावर विचार करायला हवा. राज्यात नवीन चित्रनगरी निर्माण करण्याची योजना करत असाल तर सरकारने नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओला चित्रनगरीचा दर्जा द्यावा.', असं देखील संजय राऊतांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT