Terror Attack Saam Tv
देश विदेश

Terror Attack : लग्नात दहशतवादी हल्ला, ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी, भारताचा शेजारी देश हादरला

Dera Ismail Khan wedding terror attack news : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात लग्नसमारंभात आत्मघातकी हल्ला झाला. या भीषण स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Suicide bombing at wedding in Pakistan kills 7 people : लग्नाच्या विधी सुरू होत्या, जिकडे तिकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुरू होते. त्याचवेळी अचानक आत्मघातकी हल्ला झाला अन् गदारोळ उडाला. पाकिस्तानमधील खैपूर पख्तूनख्वामधील डेरा इम्साईल खान जिल्ह्यात लग्नामध्ये दहशतवादी हल्ला झाला. या आत्मघातकी हल्ल्यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. आत्मघातकी हल्ल्यामुळे लग्नघरी शोककळा अन् गदारोळ उडाला.

२४ जानेवारी रोजी पाकिस्तानातील नूर आलम मेहसूद यांच्या घरी विवाहसोहळा दणक्यात साजरा करण्यात येत होता. पण त्याचवेळी लग्न समारंभात हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. हा आत्मघातकी स्फोट झाला तेव्हा लग्नघरात नाच-गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. आत्मघातकी स्पोटामुळे छत कोसळले अन् पसिरात एकच हाहाकार उडाला. या आत्मघातकी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोर हा स्फोटकांनी भरलेले जॅकेट घालून लग्नात आला. नाच-गाण्यात व्यस्त असणाऱ्या पाहुण्यांमध्ये हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. स्थानिक पोलिस प्रमुख अदनान खान यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. आत्मघातकी हल्ल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षा वाढवली. पोलिसांकडून हल्लेखोराच्या जोडादीराचा शोध घेतला जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारख्या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

लग्नाच्या विधी सुरू झाल्यानंतर पाहुणे ढोल-ताशाच्या तालावर नाचत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण त्याचवेळी हल्लेखोराने डाव साधला अन् हाहाकार उडाला. हा स्फोट इतका भयानक होता की छत कोसळले. जिकडे तिकडे मृतदेहाचे खच अन् रक्ताचे डाग दिसत आहेत. या हल्ल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानसारख्या भागात हल्ले वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डीपीडीच्या निधीवरून खासदार धैर्यशील मोहिते यांनी पालकमंत्र्यांना सुनावले

गर्लफ्रेंडच्या घरात घुसला, इतक्यात शेजारीण आली, बॉयफ्रेंड ४५ मिनिटं लोखंडी पेटीत लपला; पण संशय आला अन्...

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; 'या' सदस्यांचा पत्ता कट, चाहते नाराज

Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT