Pakistan Attack Ziarat social media
देश विदेश

Terror Attack : दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला, पोलीस ठाण्यात तैनात जवानांवर गोळीबार, ९ जणांचा मृत्यू

Terrorist Attack in pakistan : पाकिस्तानच्या जियारत जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी पोलीस चौकीवर हल्ला केला. यात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानमधील बलूचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. जियारत जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला चढवला. चौकीत तैनात अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन एसएचओसह ९ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी ५ पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरणही केल्याचे सांगितले जाते. हल्ल्यानंतर तात्काळ सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली. त्यात १५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

जियारत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अब्दुल कुदूस यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांनी मांगी फेज तीनमधील पोलीस चौकीला लक्ष्य केले. रात्रभर अंदाधुंद गोळीबार सुरू होता. दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एसएचओ मोहम्मद हुसैन, कोवास पोलीस ठाण्याचे एसएचओ सोहबत खान आणि दहशतवादविरोधी पथकाचे हेड कॉन्स्टेबल सैफुल्लाह यांचा समावेश आहे. जियारत जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात मृतदेह नेण्यात आले. तेथे त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

मांगी परिसरात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम संपली आहे. फ्रंटियर कॉर्प्स, बलुचिस्तान पोलीस, दहशतवादविरोधी पथक, विशेष ऑपरेशन्स विंग यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली, अशी माहिती बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार शाहिद रिंद यांनी दिली. या मोहिमेत तहरीक ए तालिबान पाकिस्तानचे (TTP) १५ दहशतवादी मारले गेले. यापुढील काळातही दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली जाईल, असेही रिंद यांनी सांगितले.

दुसरीकडे, दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तसेच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दहशतवादी हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जियारत आणि आजूबाजूच्या परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त केला. आंदोलकांनी बलूचिस्तानला पंजाब आणि खैबर पख्तुनख्वाला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT