Extramarital Affair saam tv
देश विदेश

क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन

Telangana Crime News : तेलंगणातील निजामाबादमध्ये एका महिलेवर आणि तिच्या प्रियकरावर पतीच्या हत्येचा आरोप आहे. इमारतीवरून ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रुग्णालयातील कॅन्युलाद्वारे टॉयलेट क्लीनर शरीरात सोडल्याचा आरोप आहे.

Namdeo Kumbhar

Nizamabad nurse murdered husband with toilet cleaner after failed attempt : प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या एका विवाहित महिलेने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची घटना तेलंगणाच्या (Telangana) निजामाबादमध्ये घडली आहे. पहिल्या प्रयत्नात इमारतीवरून ढकलूनही पती वाचल्याने पत्नीने थेट रुग्णालयातील 'कॅन्यूला' (Canula) द्वारे पतीच्या शरीरात 'टॉयलेट क्लीनर'चे (हार्पिक/Acid/Toilet Cleaner) इंजेक्शन टोचून जीव घेतला. या अत्यंत चक्रावून टाकणाऱ्या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

निजामाबादमधील ही धक्कादायक घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल, अशी आहे. महिलेने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. पतीने पहिल्या प्रयत्नातून जीव वाचवला, पण नराधम पत्नीने थेट मेडिकल सायन्सचा गैरवापर करत त्याची हत्या केली. या हत्येसाठी वापरलेली पद्धत ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

निझामाबादमध्ये संध्या आणि प्रशांत हे दाम्पत्य यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून संध्याच्या वागणुकीत बदल झाला होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये मतभेद सुरू झाले होते. नातेवाईकांनी तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. हे कळल्यावर तिचा नवरा तिच्याशी भांडू लागला. या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होत होती.

विवाहबाह्य संबंध आणि सततचा वादामुळे संध्याने पतीला संपवण्याचा निर्णय घेतला. पतीला संपवण्यसाठी काय करता येईल याचा तिने विचार केला. त्याचा प्रियकर यासाठी तयार झाला. पण संशय टाळण्यासाठी त्यांनी प्लान केला. संध्याने पतीच्या दारूच्या व्यसनाचा फायदा घेतला. तिने त्याला दारू पाजून आपल्या प्रियकरासोबत इमारतीच्या छतावर नेले आणि ढकलण्याचा प्रयत्न केला. पण प्रशांत वाचला.

नवऱ्याला हार्पिक इंजेक्शन दिले

प्रशांतला छतावरून खाली ढकलून मारायचे होते. त्या दोघांनी मिळून प्रशांतला इमारतीच्या छतावरून खाली ढकलले. मात्र, खाली पडून प्रशांत वाचला. गंभीर जखमी झालेल्या पतीला मारण्यासाठी तिने आणखी एक क्रूर कृत्य केले. तिने बाथरूममध्ये ठेवलेले हार्पिक छतावरून पडलेल्या पतीला दिले. आपल्या प्रियकरासोबत मिळून तिने सिरिंजने हार्पिक प्रशांतच्या नसांमध्ये टोचले. ते हार्पिक त्याच्या संपूर्ण शरीरात पसरले, त्याला विषबाधा झाली आणि त्याचे निधन झाले.

प्रशांतच्या घरच्यांना संशय आला

त्याच्या पत्नीने तो दारूच्या नशेत इमारतीवरून पडला होता, असे सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण प्रशांतच्या कुटुंबीयांना संशय आला. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला अन् सत्य समोर आले. पोलिसांनी तात्काळ संध्या आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT