Fridge Shock News Saam TV
देश विदेश

Fridge Shock News: हृदयद्रावक! चॉकलेटसाठी फ्रिज खोलताना चिमुकलीचा मृत्यू; वडिलांसमोर सोडला जीव

Electrocuted After Touching Fridge: तिचे बाबा तिला आइस्क्रिम घेऊन देत होते.

Ruchika Jadhav

Telangana News:

तेलंगानामध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पित्यासमोरच चिमुकल्या लेकीचा मृत्यू झालाय. वडिलांसोबत शॉपींग मॉलमध्ये चिमुकली खरेदीसाठी गेली होती. तिचे बाबा तिला आइस्क्रिम घेऊन देत होते. चिमुकलीला चॉकलेट हवं असल्याने ती स्वत: फ्रिज खोलते आणि मोठा अनर्थ घडतो. (Latest Marathi News)

तेलंगणाच्या निजामाबादमध्ये ही घटना घडली आहे. शॉपिंगमॉमध्ये आल्यावर फार गर्दी असते. अशात लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. शक्यतो लहान मुलांना येथे न आणणे योग्य ठरते. ऋषिता असं मृत चिमुकलीचं नाव आहे. शॉपिंगमॉलमध्ये असताना असं काही घडेल याची तिच्या वडिलांना कहीच कल्पना नव्हाती.

डोळ्यांसमोर हसणारी, खेळणारी बागडणारी आपली मुलगी आता या जगात नाही हे समजल्याने पित्याला अश्रू अनावर झालेत. घटना घडली त्यावेळी मुलीचे बाब तिच्यासाठी एका फ्रिजमधून आइस्क्रीम घेत होते. मात्र तिला चॉकलेट हवं असल्याने ती दुसरा फ्रिज खोलून चॉकलेट घेण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिला करंट लागतो.

आपल्या मुलीला करंट लागलाय हे त्या व्यक्तीच्या पटकन लक्षाय येत नाही. तो आइस्क्रीम पाहण्यातच व्यस्त असतो. जेव्हा तेथून तो निघतो तेव्हा मुलीला पाहून त्याच्या पायाखालची जमिनच सरकते. मुलीला वाचवण्यासाठी तो आरडा ओरडा करतो. फ्रिजपासून तिला वेगळं केल्यावर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र डॉक्टर तिला मृत घोषित करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT