NEET-UG पेपरफुटीप्रकरणी CJPच्या आंदोलनानंतर आता E-20 पेट्रोलच्या मुद्द्यावरही विरोधाचा सूर उमटताना दिसतोय. उद्योगपती आणि समाजिक कार्यकर्ते तहसीन पुनावाला यांनी आज म्हणजेच शनिवारपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर त्यांनी मौन मोर्चा काढण्याचाही निर्णय घेतला होता. दरम्यान आंदोलन सुरु होण्यापूर्वीच त्यांनी आरोप केलाय की, त्यांच्या घरावर धाड टाकून त्यांना घराबाहेर पडून दिलं जात नाहीये.
तहसीन पुनावाला यांनी दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांचं एक पथक त्यांच्या घरी पोहोचलं असून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. एथेनॉल विरोधात त्यांनी काही बोलून नये यासाठीच ही कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याने सांगितलं की, पोलीस असं म्हणतायत की, त्याच्या इशाऱ्यावर टीम भारताचे हजारो समर्थक येतील. यासाठीच त्यांना ताब्यात घेतलं जातंय.
दरम्यान आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये E-20 विषयावर टाउनहॉल आयोजित केलाय. या कार्यक्रमात तज्ज्ञ या धोरणाचा परिणाम झालेल्या व्यक्ती आणि या विषयात रस असलेले नागरिक सहभागी होणार असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
यापूर्वी तहसीन पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील 'टीम भारत'ने संसद भवनापर्यंत कार मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. हा मोर्चा 31 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी त्याआधी तीन दिवस 'टीम भारत'च्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतर हा मोर्चा काही काळ टाळण्यात आला होता.
तहसीन पूनावाला यांचं म्हणणं आहे की, ज्या पद्धतीने E-20 पेट्रोलची सक्ती करण्यात येतेय ते योग्य नाही. त्यामुळे सरकारने या संदर्भातील नियमांमध्ये बदल केले पाहिजेत. त्यांच्या मते, E-20 पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत किमान 20 टक्क्यांनी कमी असली पाहिजे. तसंच, देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्यायही उपलब्ध करून दिला गेला पाहिजे.
तहसीन पुनावाला यांनी उपोषणाची घोषणा करतानाच सांगितलं होतं की, त्यांना कोणताही कायदेशीर आदेश किंवा लेखी नोटीस पाठवण्यात आलेली नाही. एथेनॉल हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. आता मला रोखण्यासाठी किती पोलीस तैनात केले जातात, हे पाहायचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.