Vijays Political Rally Stampede Saam
देश विदेश

काहींनी लोकांना तुडवलं, काही झोपडपट्टीत घुसले, चेंगराचेंगरीत नेमकं काय घडलं? भयानक VIDEO समोर

Vijays Political Rally Stampede: करूरमध्ये विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांचा मृत्यू तर, ७० हून अधिक लोक जखमी. २७ हजार लोकांच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती.

Bhagyashree Kamble

  • विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी.

  • ३९ जणांचा मृत्यू.

  • २७ हजार लोकांच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर.

हजारो लोकांची गर्दी, रात्रीचा अंधार, सगळीकडे धावाधाव, विखुरलेले बूट - चप्पल.. शनिवारी तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीतील ही दृश्य. रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला. ९५ जणांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

तामिळनाडूचे डीजीपी जी. वेंकटरमण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिनेता विजय कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्यामुळे गर्दी वाढली. नियंत्रणबाहेर गेली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये काही लोक झोपडपट्टीचे छत फाडून पळून जाताना दिसले. दुसऱ्या व्हिडिओत चेंगराचेंगरीनंतर महिला असह्यपणे रडताना दिसत आहेत.

विजय थलापती शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचतील, अशी टीव्हीके पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले होते. त्यामुळे लोक सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी पोहोचले. परंतु विजय सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचला. रॅलीसाठी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी मागण्यात आली होती.

कडक उन्हात लोक विजय थलापतीची वाट बघत होते. लोकांकडे पुरेसे अन्न आणि पाण्याची कमतरता होती. वेंकटरमण यांनी स्पष्ट केलं की, आयोजकांना १० हजार लोकांची गर्दी अपेक्षित होती. परंतु,अभिनेता विजयची एक झलक पाहण्यासाठी सुमारे २७ हजार लोक जमले होते.

मात्र, यानंतर चेंगराचेंगरी झाली. ही चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली? डीजीपी म्हणाले की, सरकारने कारण तपासण्यासाठी चौकशी आयोगाची घोषणा केली आहे. गर्दी आणि उपस्थितांच्या समस्यांबद्दल आयोजकांना स्पष्टपणे माहिती देण्यात आली. दरम्यान, अभिनेता विजयच्या चेन्नई येथील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT