Saam Tv
देश विदेश

Tamil Nadu Accident: भीषण अपघात; ट्रकची व्हॅनला धडक, ७ महिलांचा जागीच मृत्यू

Road Accident: तमिळनाडूमध्ये व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. तिरुपथूर येथे उभ्या असलेल्या एका व्हॅनला छोट्या ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tamil Nadu Accident:

तमिळनाडूमध्ये व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. तिरुपथूर येथे उभ्या असलेल्या एका व्हॅनला छोट्या ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. ही धडक इतकी जबर होती की, व्हॅनमधील ७ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण गंभीररित्या जखमी झाल्याचं वृत एनआयएनं दिलंय. (Latest News on National)

या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघात मृत पावलेलं सर्वजण हे एकाच गावातील नागरिक होते. ते दोन दिवसाच्या सहलीसाठी म्हैसूरला गेले होते. घटनेविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हे सर्व प्रवाशी दोन दिवसाच्या सहलीसाठी गेले होते. एका गावाचे असलेले सर्व प्रवाशी दोन व्हॅनने हे प्रवाशी प्रवास करत होते.

दोन दिवसाची सहल पूर्ण करून परतत असताना एका व्हॅनचा अपघात झाला. म्हैसूरवरून परताना नत्रामपल्लीला पोहोचल्यानंतर एक व्हॅन नादुरुस्त झाली. यामुळे व्हॅनमधील काही प्रवाशी व्हॅनच्या पुढे रस्त्यावर येऊन बसले. त्याचवेळी व्हॅनच्या मागून येणाऱ्या एका छोट्या ट्रकनं व्हॅनला धडक दिली. यामुळे ही व्हॅन पुढे ढकलल्या गेली. त्यामुळे रस्त्यावर बसलेले सर्व प्रवाशी व्हॅनच्या खाली चिरडल्या गेले.

तिरुपथूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात तिरुपथूर जिल्ह्यातील नत्रामपल्ली गावाच्या परिसरात झाला. सकाळी दृश्यमान कमी होते. त्यात अपघातग्रस्त व्हॅन अपघाती वळणावर उभी होती. त्यामुळे मिनी ट्रकची धडक झाली असावी. दरम्यान अपघातात ठार झालेल्या महिला व्हॅनच्या पुढे रस्त्यावर बसल्या होत्या.

व्हॅन नादुरुस्त झाल्यामुळे ती रस्त्याच्या बाजूला उभी होती. या अपघातात १० जखमी झाले आहेत, तर ७ महिला जागीच मृत पावल्या आहेत. दरम्यान या घटनेचा पुढील तपास केला जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT