Stampede at Vijay Thalapathy’s rally in Karur leaves 31 dead and 40 injured; confusion over real cause. saam tv
देश विदेश

Tamil Nadu Stampede: विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळे झाली? नेत्यांमुळे की पाण्याच्या बाटल्या वाटपामुळे? मुख्य कारण काय

vijay Thalapathy Rally Stampede: तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात ३१ जणांचा मृत्यू झालायतर ४० हून अधिकजण जखमी झालेत.

Bharat Jadhav

तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता आणि राजकारणी विजय थलपतीच्या रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना झालीय. या रॅलीसाठी सुमारे ३०,००० लोक जमले होते. या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत ३१ जणांचा मृत्यू झालाय. पण ही घटना कशामुळे झाली याचे कारण समोर आले आहे. कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं जात आहे. तर काहींनी पाणीच्या बाटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलंय. दरम्यान या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक जखमी झालेत.

दरम्यान मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि पीडितांना युद्धपातळीवर मदत पुरवण्याचे आदेश दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि उपचार सुनिश्चित करण्याचे आदेश दिलेत.

चेंगराचेंगरीची घटना कशामुळे घडली?

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विजय थलपथीने त्याच्या विशेष रॅलीच्या बसमधून लोकांना पाण्याच्या बाटल्या वाटण्यास सुरुवात केली. तेव्हा लोकांनी पाण्याची बाटली घेण्यास बसकडे धाव घेतली. ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक त्यात जखमी झाले. तर काही लोकांच्या मते, अभिनेता विजयच्या रॅलीला मोठी गर्दी जमली होती. परंतु कार्यक्रम उशिराने सुरू झाला. गर्दी वाढल्यानं लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. गर्दी आणि उकाड्यामुळे लोक बेशुद्ध होऊ लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT