CM VIJAY FACES BIG SETBACK AS 37 MPS BOYCOTT DELIMITATION MEETING  saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! CMच्या बैठकीला ३७ खासदारांची दांडी, काय आहे कारण?

Tamil Nadu Politics : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनेक खासदारांनी दांडी मारलीय. द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्यासह ३७ खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री विजय यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली.

  • या बैठकीला द्रमुक आणि अण्णाद्रमुकसह ३७ खासदारांनी बहिष्कार टाकला.

  • खासदारांनी ही बैठक अनावश्यक असल्याचा दावा केला.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपतीविजय यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय बैठकी बोलवली होती. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला अनेक खासदारांनी दांडी मारली. द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्यासह ३७ खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. ही बैठक अनावश्यक असल्याच खासदारांनी म्हटलंय. कावेरी नदीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला हा एक डाव होता, असा आरोप कानिमोळी यांनी आरोप केला आहे.

डीएमकेने याला 'अनावश्यक' बैठक म्हटलंय. मुख्यमंत्री जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डीएमकेनं केलाय. बैठकीवर टाकण्यात आलेल्या बहिष्काराबाबत डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी बोलावलेली ही बैठक पूर्णपणे 'अनावश्यक' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कावेरी नदीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हाच या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचा आरोप कनिमोळी यांनी केला आहे.

राज्यातील एकूण ५७ खासदारांपैकी ३७ जणांनी या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मुख्यमंत्री विजय यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय.ही बैठक आज दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला केवळ २० खासदार उपस्थित राहतील?

बैठकीला खासदारांच्या संभाव्य उपस्थितीबाबतची आकडेवारी असे दर्शवते की, मुख्यमंत्री विजय यांच्या बैठकीला अनेक पक्षातील खासदारांनी दांडी असेन. बैठकीला फक्त २० खासदार उपस्थिती असून यात १२ काँग्रेसमधील , VCK-२, CPI-२, CPI(M)-२, MDMK-१, IUML-१ खासदार उपस्थित आहेत. दुसरीकडे, डीएमके (DMK) या बहिष्काराचे नेतृत्व करत आहे. त्यांचे सर्व ३० खासदार या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. यासह विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमके (AIADMK) चे चार खासदार, तसेच पीएमके (PMK), एमएनएम (MNM) आणि डीएमडीके (DMDK) या पक्षांचे प्रत्येकी एक खासदार यांनीही या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Cardamom for Diabetes: 1 वेलचीमुळे शुगर लेव्हल होऊ शकते कमी, डायबिटीजच्या रुग्णांनी अशा पद्धतीने करा सेवन!

दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामांवर ताव, 'त्या' व्हिडिओने महाराष्ट्रात खळबळ, शिरसाट म्हणाले...

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

SCROLL FOR NEXT