K Annamalai supports Cockroach Janata Party over Delhi Police action saam tv
देश विदेश

मोदी-शहांचं टेन्शन वाढलं! भाजपच्या माजी अध्यक्षांचा CJPला पाठिंबा; निर्दशनात आणली दिल्ली पोलिसांची चूक

CJP Protest Row: निवडणूक आयोग आणि एसआयआरविरोधातील निदर्शनांदरम्यान सीजेपीच्या नेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत सीजेपीला पाठिंबा दर्शवला आहे.

Bharat Jadhav

  • दिल्लीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  • आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या तुरुंगवासात वाढ

  • के. अण्णामलाई यांनी सीजेपीला पाठिंबा दर्शवला

कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रमुख नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या तुरुंगवारीत वाढ करण्यात आलीय. त्यावरून दिल्ली पोलिसांवर विरोधकांकडून टीका केली जातेय. त्याचदरम्यान तमिळनाडूचे भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि 'वी द लीडर्स' चळवळीचे संस्थापक के. अण्णामलाई यांनी सीजेपीला पाठिंबा दर्शवलाय.

दिल्लीत निवडणूक आयोग आणि एसआयआर विरोधात निदर्शने करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईवर त्यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलेत.

सीजेपीच्या नेत्यांना त्रास देणं चुकीचं

माध्यमांशी बोलताना अण्णामलाई म्हणाले की, सीजेपी ज्या पद्धतीने निषेध नोंदवते, त्या पद्धतींशी ते पूर्णपणे सहमत नाहीये, पण सीजेपी सरकारसमोर जे मुद्दे आणि प्रश्न उपस्थित करत आहे, त्यांवरून त्यांचा सीजेपीला पूर्ण पाठिंबा आहे. तुरुंगात सीजेपी नेत्यांना वाईट वागणूक देणे, ही दिल्ली पोलिसांकडून झालेली एक मोठी चूक आहे.

दिल्लीत सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आणि विद्यार्थी नेत्यांच्या अटकेची कारवाई आणि दिल्ली पोलिसांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त करताना के. अण्णामलाई म्हणाले, "माझ्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत वेगळीच भीती आणि चिंता वाटतेय. "मला असे वाटतं की दिल्ली पोलिसांनी कायदा आपल्या हातात घेतलाय. जरी मी सीजेपीच्या (CJP) निषेध करण्याच्या पद्धतींशी किंवा त्यांच्या काही आयडियाशी पूर्णपणे सहमत नसलो तरी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना माझा पूर्ण पाठिंबा आहे."

सीमांकन प्रक्रियेबाबत केंद्र सरकार आणि किरेन रिजिजू यांना सल्ला

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सीमांकनाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देताना अण्नामलाई म्हणाले की, दक्षिण भारतातील राज्यांच्या हितांचे रक्षण झालं पाहिजे. भारताला सीमांकनाची नक्कीच गरज आहे, परंतु ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असायला हवी. विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांच्या बाबतीत. आपल्या लोकसंख्या वाढीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे. सीमांकन प्रक्रियेदरम्यान दक्षिण भारतीय लोकांवर कोणत्याच प्रकारचे अन्याय होऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Dasara Melava live : शिवतीर्थावर कोणाकोणाची होणार भाषणे? पाहा यादी

Chanakya Niti : शत्रूच नाही तर संकटंही तुमच्यासमोर होतील नतमस्तक; जीवनाचं हे सत्य बदलतील तुमचं आयुष्य

Ladki Bahin Yojana: दिवाळीत होणार डबल धमाका? लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० जमा होणार?

Kitchen Tips : लोखंडाच्या कढईत विसरूनही शिजवू नका 'या' गोष्टी; आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

Maharashtra News Live Update: वाड्यात रहात्या घरात वृद्ध महिलेची हत्या; अंगावरील दागिने घेऊन चोरटे पसार

SCROLL FOR NEXT