Taliban Government New Law For Womens Google
देश विदेश

Taliban New Law: घराच्या खिडक्या बंद करा! अफगाणिस्तानात महिलांसाठी तालिबानचा नवा फतवा

Taliban Government New Law For Womens: पालिका अधिकारी आणि इतर संबंधित विभाग नवीन घरांवर लक्ष ठेवतील. या घरांच्या खिडक्या किंवा व्हेंट शेजाऱ्यांच्या घराकडे उघडू नयेत, याची काळजी त्यांनी घ्यावी.

Bharat Jadhav

घर बांधताना आणि घेताना वातानुकूलित आहे का, नाही हे आपण पाहत असतो. एखाद्या घरात खिडक्या नसतील तर त्या घरात काळोख असतो. खिडकी नसलं तर आपण ते घर घेण्यास नकार देत असतो. अफगाणिस्तानात मात्र खिडक्या बंद करण्याचे आदेश तेथील सरकारने दिलेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने महिलांविरोधात नवा फतवा जारी केलाय.

तालिबानच्या नव्या कायद्यानुसार,अफगाणिस्तानमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये खिडक्या नसल्या पाहिजेत, असा अगळावेगळा फर्मान तालिबानने का काढला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. महिला घराबाहेर पाहू नयेत, यासाठी तालिबान सरकारच्या सर्वोच्च नेत्यानं आदेश जारी केलाय. यात त्यांनी म्हटलंय की, महिलांना पहिल्यानंतर अश्लील हावभाव आणि कृत्य होतील.

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी X वर या संदर्भात एक पोस्ट जारी केलीय. नव्या घरात घरातून अंगण, स्वयंपाक घर, शेजारच्या घराजवळील विहीर किंवा महिलांच्या उपयोगात येणारी अशी कोणतीही जागा दिसणार नाही, अशा ठिकाणी खिडक्या करू नयेत. स्वंयपाक घरात काम करताना, अंगणातून जाता येता, किंवा विहिरीवरून पाणी घ्यायला जाताना महिलांना पाहून लोक अश्लील कृत्य करू शकतात किंवा हावभाव करतील, त्यामुळे घरातील खिडक्या असतील त्या बंद करा. किंवा नवं घर बांधताना खिडक्या करू नये, असं मुजाहिद यांनी आपल्या आदेशात म्हटलंय.

तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार,पालिका अधिकारी आणि इतर संबंधित विभागही बांधल्या जाणाऱ्या नवीन घरांवर लक्ष ठेवतील. या घरांमध्ये शेजाऱ्यांच्या घराच्या दिशेने खिडक्या असतील तर त्या उघडू नयेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. जर कोणत्या घरात आधीच शेजाऱ्याच्या घराकडे खिडक्या असतील किंवा दार असेल तर त्या घरात राहणाऱ्या लोकांनी खिडक्या बंद कराव्यात. घर मालकांना आपल्या घरात असलेल्या खिडक्यांकडे भिंत बांधावी लागेल.

किंवा काही वेगळी सोय करावी लागेल. जेणेकरून शेजारील व्यक्ती त्या खिडकी किंवा दरवाजाकडे पाहणार नाही, असं तेथील सरकारने म्हटलंय. ऑगस्ट २०२१ पासून अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेले तालिबान महिलांच्या हक्कांवर बंदी घालत आहे. युनायटेड नेशन्सनेही तालिबानच्या महिलांबाबतच्या धोरणांवर आक्षेप व्यक्त केलाय. तालिबानने महिलांना काम करण्यास बंदी घातलीय. तसेच मुलींना आणि महिलांना प्राथमिक शिक्षण संस्था, पार्क असा सार्वजनिक ठिकाणी येण्या-जाण्यावर मनाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

SCROLL FOR NEXT