तालिबानी नेते पत्रकारांना मुलाखत देतात पण मोदी? या व्हायरल फोटोमुळे मोदी ट्रोल! twitter/@MSharif1990
देश विदेश

तालिबानी नेते पत्रकारांना मुलाखत देतात पण मोदी? या व्हायरल फोटोमुळे मोदी ट्रोल!

सध्या हा फोटो व्हायरल होतोय. यात एक तालिबानी नेता पत्रकाराला मुलाखत देतोय. सभोवताली सशस्त्र सैनिक आहेत, पण या फोटोवरुन आता मोदींना का ट्रोल केलं जातंय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काबुल: "one photo can say more than a thousand words" म्हणजे "एक फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलू शकतो" असं म्हटलं जातं. या म्हणीचं आणखी एक ताजं उदाहरण समोर आलंय. महासत्ता अमेरिकेला माघार घ्यायला लावणाऱ्या तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवला. पण, तालिबानी नेते हे पत्रकारांना किती घाबरतात यांचा एक बोलका फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Taliban leaders give interviews to journalists but Modi? Modi trolls because of this viral photo!)

हे देखील पहा -

न्यूयॉर्क टाईम्स ते अफगाणिस्तानचे पत्रकार शरिफ हसन यांनी हा फोटो ट्विट केला आहे, त्यानंतर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे मुलाखत घेण्यासाठी आलेली पत्रकार हा तालिबानी नेत्याला धोकादायक वाटू लागला आहे. त्यामुळेच या नेत्याच्या सुरक्षेसाठी त्याच्या दोन्ही बाजूला दोन-दोन सशस्त्र तालिबानी सैनिक सावधानतेने उभे आहेच. पत्रकार मात्र आपला कॅमेरा, माईक, वही-पेन घेऊन मुलाखत घेण्यासाठी तयार आहे. त्यामुळे एका पत्रकाराकडून तालिबानी नेत्यांना किती असुक्षित वाटतं हे यात स्पष्ट दिसतंय.

पत्रकार शरिफ हसन यांनी हा फोटो ट्विट करत लिहीलं की, "एक तालिबानी नेता, M4 ने सज्ज असलेले त्याचे भितीदायक अंगरक्षक, आणि एक पत्रकार, त्याचे कॅमेरे, पेन आणि वही. हे सर्व एकाच खोलीत." हा फोटो अनेकांनी रिट्वीट केला आहे.

मोदी का होतायत ट्रोल?

तालिबानी नेत्याच्या या फोटोमुळे अनेकजण मोदींनी ट्रोल करतायत. अनेकांनी या तालिबानी नेत्याची तुलना चक्क पंतप्रधान मोदींशीच केली आहे. मुलाखतकार राजू परुळेकर यांनीही हा फोटो रिट्वीट करक मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहीतात की, "कमीत-कमी तो तालिबानी नेता मुलाखत कर देतोय"

तर दुसऱ्या एका युजरने लिहीलं की तालिबानी कसेही असतील पण पत्रकार परिषद घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच देशवासीयांना रेडिओ, टिव्ही, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून संबोधित करत असतात. त्यांची पंतप्रधान पदाची दुसरी टर्म सुरु आहे पण अद्यापही त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही त्यामुळे विरोधकही अनेकदा त्यांच्यावर टीका करत असतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT