Taliban claims to have killed 58 Pakistani soldiers in a deadly border clash following Pakistan’s airstrike. saam tv
देश विदेश

पाकिस्तानची जिरवली; सीमेवरील चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा

58 Pakistani Soldiers Killed in Border: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावर्ती भागात भीषण संघर्ष सुरू झाला आहे. ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे.

Bharat Jadhav

  • अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर जोरदार चकमक.

  • तालिबानचा दावा – पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार, ९ तालिबानींचा मृत्यू.

  • अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला दिलं प्रत्युत्तर.

पाकिस्तान आणि अफगनिस्तानमध्ये युद्ध पेटलंय. पाकिस्तानच्या एअर स्ट्राइकला अफगाणिस्ताननं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या चौक्यांना उद्धवस्त केलंय. दोन्ही देशांच्या सीमेरेषेवर झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार केल्याचा दावा अफगाणिस्तानने केलाय. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी याबाबत माहिती दिलीय. शनिवारी रात्री सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेले, असे अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थे टोलो न्यूजने वृत्त दिले आहे.

जबीहुल्लाहच्या म्हणण्यानुसार, या चकमकींमध्ये तालिबान सैन्यातील ९ सदस्यही मारले गेले आणि १६ जण जखमी झाले. दरम्यान, अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री, मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानला इशाराही दिला आहे. ड्युरंड रेषेवर अफगाण सैन्य देशाच्या सीमांचे "रक्षण करण्यास पूर्णपणे तयार" आहेत. आता अफगाणिस्तान पाकिस्तान कधी न विसरू शकणारा भयानक हल्ला करेल असा धमकी वजा इशारा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे.

तालिबान सरकारने पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना "जोरदार प्रत्युत्तर" दिलं, यात हेलमंड, कंधार, पक्तिका, खोस्त, पक्तिया, जाबुल, नांगरहार आणि कुनार प्रांतातील लष्करी आणि मिलिशिया चौक्यांना लक्ष्य केल्याचे याकूब मुजाहिद म्हणाले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई पूर्ण झाली. मुजाहिदने "इस्लामिक आर्मी" ला ड्युरंड रेषेवर हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिलेत आणि जर पाकिस्तानने "मागील चुका पुन्हा केल्या तर" काबूलचा प्रतिसाद "पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असेल" असा इशारा त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : कुठलंही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा...; अजित पवारांचं शरद पवारांसोबत जोरदार भाषण

Maharashtra Live News Update: स्मार्ट सिटीचा स्मार्टपणा उघड, कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून स्मशानभूमीत अंत्यविधी

मोठी बातमी! हनी ट्रॅपमध्ये आमदाराला अडकवण्याचा बहीण-भावाचा प्लॅन, मोबाईलवर पाठवले अश्लील चॅट, व्हिडिओ

Relationship Tips: या छोट्या चुकांमुळे तुमच्या नात्यात येईल दुरावा, वेळीच घ्या काळजी

Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

SCROLL FOR NEXT