Taliban Ban On Women Saam Tv
देश विदेश

Taliban Ban On Women: तालिबानचा आणखी एक अजब फतवा; महिलांना रेस्टॉरंटमध्ये जाण्यास बंदी

Taliban News : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून येथील नागरीकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

Shivani Tichkule

Taliban Ban On Women In Restaurants : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून येथील नागरीकांचे जगणे मुश्किल झाले आहे.  तालिबान आल्यापासून अफगाणिस्तानामध्ये महिलांची अवस्था बिकट होत चालली आहे.

नुकताच तालिबानकडून आणखी एक फतवा काढण्यात आला आहे. यात फतव्यानुसार महिलांना आता गार्डन रेस्टॉरंटमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या फतव्यानुसार महिलांना या ठिकाणी सह कुटुंब देखील जाता येणार नाही.   (Latest Marathi News)

तालिबान (Taliban) सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इस्लामिक गुरू आणि लोकांच्या सल्ल्यानुसार, गार्डन रेस्टॉरंटमध्ये (Hotel) महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. काही लोकांच्या तक्रारीवरून असे पाऊल उचलण्यात आल्याचे तालिबानने म्हटले आहे. अशा ठिकाणी महिला आणि पुरुष एकत्र असतात आणि महिला हिजाब घालत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी

मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो, असे तालिबानला वाटते. यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन ही औषधे कोणत्याही परिस्थितीत वापरू नयेत, असा इशारा दिला होता. दुकानदारांनाही धमकावण्यात आले आहे, असे कोणत्याही गोळीची विक्री करू नये. मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे पाश्चात्य देशांचे षडयंत्र आहे. त्यामुळे तालिबानी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.

मुलींच्या शिक्षणावर बंदी

अफगाणिस्तानमधील खासगी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलींना विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली होती. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विद्यापीठांवर कठोर कारवाई करण्याचेही सांगण्यात आले. याआधीही महिलांना उद्यानात जाण्यास आणि जिममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महिलांच्या मीडियामध्ये काम करण्यावर बंदी

अफगाणिस्तानात तालिबान सरकारने शालेय शिक्षणाला फटका बसल्यानंतर माध्यम क्षेत्रातील महिलांवर अनेक निर्बंध लादले. तालिबानकडून मीडियाला स्पष्टपणे सांगण्यात आले की पुरुषांसोबत कोणतीही महिला अँकर शो होस्ट करणार नाही, तर कोणत्याही महिला पाहुण्याला शोमध्ये आमंत्रित केले जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT