Pakistan Afghanistan Conflict Social Media
देश विदेश

Pakistan Afghanistan Conflict : अफगाणिस्तान-पाकिस्तानात युद्ध सुरु; तालिबान आर्मीकडून एअरस्ट्राइक, १९ सैनिकांचा मृत्यू

Pakistan Afghanistan war : अफगाणिस्तान-पाकिस्तानात युद्धाला सुरुवात झाली आहे. तालिबान आर्मीने पाकिस्तानवर एअरस्ट्राइक केला. या एअरस्ट्राइकमध्ये १९ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : अफगाणिस्तान आमि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झालं आहे. तालिबान आर्मी आणि पाकिस्तान सैनिक सीमेवर आमनेसामने उभे ठाकले आहेत. तालिबानी आर्मीने केलेल्या एअरस्ट्राइक हल्ल्यात पाकिस्तानचे १९ सैनिक मारले गेले आहेत. तर ३ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या माध्यमांनी ही माहिती दिली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने खोस्त प्रातांत अली शिर जिल्ह्यातील पाकिस्तानी सैन्य दलाच्या अनेक चौकी पेटवून दिल्या. तसेच डंड-ए-पतन जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी चौकींचा ताबा मिळवला. स्थानिक माध्यमांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी डंड-ए-पतन जिल्ह्यातील जिल्ह्यातील मोर्टार शेलमुळे तीन अफगाणिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर मंगळवारी रात्री पक्तिका प्रांतात अफगाणिस्तानने हल्ला केला होता. या हल्ल्यात ५१ लोक मारले गेले होते. यामध्ये महिला आमि लहान मुलांचाही समावेश आहे. पाकिस्तानी सैन्याचं म्हणणं आहे की, 'अफगाणिस्तानच्या जमिनीतून पाकिस्तानवर दहशतवादी हल्ले केले जातात.

पाकिस्तानच्या आरोपानुसार, अफगाणिस्तानात तालिबानला सत्ता मिळाल्यानंतर दहशतवादी हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानी सरकारचं म्हणणं आहे की, 'वाढत्या हल्ल्यामुळे टीटीपीला प्रोत्साहन मिळालं आहे. या संघटनेला पाकिस्तानात सत्ता मिळवायची आहे. ही बाब त्यांच्या इतर संघटनेने काबूलमध्ये केली आहे.

सेंटर फॉर रिसर्च एंड सिक्योरिटी स्टडीजनुसार, एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानात २०२३ दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या २०२२ च्या तुलनेत ५६ टक्क्यांनी वाढली आहे. यात एकूण १५०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. त्यात ५०० सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इस्लामाबादने काबुलच्या शासनावर सीमापार दहशतवादाचा आरोप केला आहे. त्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तान सरकारमधील संबंध अधिकच तणावपूर्ण बनले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT