Suvendu Adhikari after resigning from the Nandigram assembly seat following his oath as Chief Minister of West Bengal. saam tv
देश विदेश

७ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुवेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Suvendu Adhikari Resigns Nandigram Mla After Becoming Cm: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दोन जागांवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी भवानीपूरची निवड करत हा निर्णय घेतला.

Omkar Sonawane

बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी आपला बालेकिल्ला असलेल्या पूर्व मोदीनीपुरमधील नंदीग्राम या परंपरागत विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष रथिंद्र बोस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, नंदीग्राम माझ्या हृदयात आहे. नंदीग्रामच्या जनतेला मी कधीही कशाची कमतरता भासू देणार नाही, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपुर अशा दोन जागांवर विजय मिळवला होता. नियमानुसार आपल्याला एक जागा सोडावी लागेल अशी घोषणा त्यांनी आधीच केली होती.

भवानीपूर मतदारसंघाचे आमदार म्हणून घेतली शपथ

राज्यात नुकतेच भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, बुधवारी विधानसभेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघाचे आमदार म्हणून शपथ घेतली होती. नियमानुसार कोणीही एकाच वेळी दोन मतदारसंघांचे आमदार राहू शकत नसल्यामुळे, आपण नंदीग्रामची जागा सोडणार असल्याचे त्यांनी त्याच दिवशी स्पष्ट केले होते.

कोलकातामधील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात १५ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव केला आहे. यापूर्वी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या नंदीग्राम या पारंपरिक मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत १९५६ मतांनी पराभव केला होता. दरम्यान, नंदीग्रामच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सुवेंदू यांनी पुन्हा एकदा विश्वास दिला की, आगामी काळात आम्ही नंदीग्रामच्या जनतेला दिलेली सर्व निवडणूक आश्वासने लवकरच पूर्ण करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flat Stomach Tips: कोणताही व्यायाम न करता पोट होईल सपाट! फक्त बदला तुमच्या 'या' सवयी

Maharashtra News Live Update: - सीबीआयकडून लातूर मधील खाजगी क्लास चालकाची तब्बल 9 तास कसून चौकशी

IAS Transfer: 15 सीनियर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय विभागात मोठा फेरबदल

Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रामाणिक अन् रोमॅंटिक; मनापासून जपतात नाती

PAN कार्डधारकांसाठी मोठा बदल! पैसे काढण्यासाठी नव्या अटी अन् नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT