Surat Crime News  saam TV
देश विदेश

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Surat lawyer arrested POCSO case : गुजरातच्या सुरतमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका वकिलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.

Namdeo Kumbhar

Surat Crime News : गुजरातच्या सुरत शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षी बलात्कार झाला होता. त्या पीडित महिलेवर वकिलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायद्यासाठी लढणाऱ्या रक्षकाच्या या काळ्या कृत्याने खळबळ उडाली आहे.

न्यायालयीन खटल्यात मदत करण्यासाठी १३ वर्षाच्या बलात्कार पीडितेच्या गरीब मजूर पालकांनी ४३ वर्षाच्या वकिलाची मदत घेतली होती. मात्र, वकिलाने फी म्हणून १५,००० रुपयांची मागणी केली. गरीब कुटुंबाला एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने, वकिलाने फीऐवजी त्या पीडित मुलीला आपल्या घरी घरकामासाठी ठेवण्याची ऑफर दिली. मुलगी घरी कामाला आल्यानंतर नराधम वकिलाने तिच्यावर बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास जुना खटला खराब करण्याची धमकी दिली.

मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मंगळवारी दिंडोली येथील वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीला अटक केली. तो अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यातल्या एका गावचा रहिवासी आहे. तक्रारीनुसार, मजूर म्हणून काम करणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात कायदेशीर मदतीसाठी वकिलाशी संपर्क साधला होता. "त्याने म्हणून १५,००० रुपयांची मागणी केली होती. कुटुंबीयांना ही रक्कम परवडत नसल्याने, त्याने त्या मुलीला आपल्या घरी घरकामगार म्हणून काम देण्याच्या बदल्यात आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली. जेव्हा ती मुलगी त्याच्या घरी गेली, तेव्हा वकिलाने तिच्यावर बलात्कार केला." असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

जीआयडीसी पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करून वकिलाला अटक केली. त्याच्यावर बीएनएस कायद्यांतर्गत बलात्कार, १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार, गुन्हा करण्यासाठी मुलाचा वापर करणे, दुखापत पोहोचवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे, तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर लैंगिक अत्याचार आणि संबंधित गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे यापूर्वीचे प्रकरण सप्टेंबर २०२५ मधील आहे. पीडित मुलीचे कथित अपहरण झाले होते. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचा शोध लागला. त्यावेळी ती १२ वर्षांची होती. त्या प्रकरणातील तपासकर्त्यांनी आरोप केला होता की, दोन व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केला होता. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सरकारी वकील फिर्यादी पक्षाचे प्रतिनिधित्व करत असले तरी, मुलीच्या वडिलांनी खटल्याच्या कार्यवाहीत मदत करण्यासाठी त्याची नियुक्ती केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT