Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांना शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर गुजरातमधील सुरत शहरातील सत्र न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे. कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी 2019 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. (Latest Marathi News)
2019 मध्ये केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने 23 मार्चला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत (Surat) सत्र न्यायालयात या संदर्भात अपिल केलं होतं. न्यायालयात केलेल्या अपिलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती.
या प्रकरणात याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या प्रकरणावर पुर्णेश मोदी यांनी न्यायालयाला आपलं म्हणणं सादर केलं आहे. या मध्ये त्यांनी ही समाजिक लढाई असल्याचं म्हटलं आहे.
हे संपूर्ण प्रकरण आहे
23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2019 मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.
राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं.
त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.