नवी दिल्ली : न्यायालयाचा अवमान केल्याने उद्योगपती विजय मल्ल्या (vijay mallya) यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (सोमवार) शिक्षा सुनावली. या अंतर्गत मल्ल्यास चार महिने तुरुंगवास आणि दाेन हजार रुपयांचा दंड (fine) भरावा लागणार आहे. याबराेबरच न्यायालयाने मल्ल्याला चार आठवड्यांच्या आत आठ टक्के व्याजासह 40 दशलक्ष युएस डाॅलर्स जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. (Vijay Mallya Latest News Update)
न्यायमूर्ती यूयू ललित, रवींद्र एस भट आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दहा मार्च रोजी न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. मल्ल्याविरुद्धच्या खटल्यात कोणतीही प्रगती होऊ शकत नाही, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले होते.
मल्ल्याची पुनर्विलोकन याचिका फेटाळली
न्यायालयाने (सन 2020) मल्ल्याच्या (सन 2017) निकालाच्या पुनर्विचारासाठी दाखल केलेली पुनरीक्षण याचिका फेटाळली होती. मल्ल्याच्या वकिलाने दहा मार्चला त्याच्या यूके-स्थित क्लायंटकडून कोणतीही सूचना प्राप्त होऊ शकली नाही, त्यास अर्धांगवायू झाला होता. अवमान प्रकरणात ठोठावल्या जाणाऱ्या शिक्षेच्या कालावधीबाबत त्याची (माल्ल्या) बाजू मांडू शकत नाही असं म्हटलं हाेते.
मल्ल्यास (सन 2017) नऊ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले हाेते. त्याच्यावस (सन 2017) न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चाळीस दशलक्ष डॉलर्स आपल्या मुलांना हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निधी हस्तांतरणाला स्थगिती दिली होती. अवमान प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १० मार्च रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी खंडपीठाला मदत करणारे ज्येष्ठ वकील जयदीप गुप्ता यांनी सांगितले होते की, मल्ल्याला दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. (Vijay Mallya Sentence To 4 Month Jail)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.