supreme Court Saam Tv
देश विदेश

SC On Alimony: पहिल्या पत्नीप्रमाणे पोटगी द्या; नवऱ्याकडे ५०० कोटींची मागणी करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

SC On Alimony: पहिल्या पत्नीप्रमाणे आपल्याला पोटगी मिळावी अशी मागणी करणाऱ्या एका महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारलंय. न्यायालयाने या महिलेची मागणीही फेटाळून लावलीय.

Bharat Jadhav

'शादी का लड्डू जो खाए पछताए और जो ना खाए वो भी पछताए' ही म्हण तुम्ही ऐकली असेल. या म्हणीची प्रचिती अमेरिकेत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्याला आलीय. अमेरिकेत आयटी कन्सल्टन्सी चालणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला लग्नाचा लाडू चांगलाच महागात पडलाय. विशेष म्हणजे या व्यक्तीला लग्न आणि घटस्फोटाची मोठी किंमत मोजावी लागलीय. पहिल्या लग्नाचा संसार तुटल्यानंतर या व्यक्तीने दुसरं लग्न केलं, परंतु तेही काही कारणाने तुटलं.

या दोन्ही घटस्फोटाची मोठी किंमत या व्यक्तीला मोजावी लागलीय. नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्या पत्नीला ५०० कोटी रुपये पोटगी दिल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्याला दुसऱ्या पत्नीला १२ कोटी रुपये देण्याचा आदेश दिलाय. या व्यक्तीचं दुसरं लग्न काही महिनेच टिकलं. या व्यक्तीने आपले मोडलेले लग्न रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्याला दुसऱ्या पत्नीला १२ कोटी रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिलाय.

याबरोबरच सुप्रीम कोर्टाने या महिलेलाही फटकारलंय. मात्र न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि पंकज मिथल यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दुसऱ्या पत्नीची मागणी फेटाळून लावली. या व्यक्तीचे दुसरे लग्न ३१ जुलै २०२१ रोजी झाले आणि काही महिन्यांनी ते तुटलेही. त्यावेळी दुसऱ्या पत्नीने कायमस्वरूपी पालनपोषणाची मागणी करत पहिल्या पत्नीला दिलेल्या पोटगीप्रमाणेच पोटगी द्यावी अशी मागणी केली होती.

मात्र खंडपीठाने पहिल्या पत्नीसोबत अनेक वर्षे वैवाहिक जीवन जगल्याच्या तुलनेत दुसऱ्या पत्नीचे प्रकरण वेगळे असल्याचं म्हणत ही मागणी फेटाळून लावलीय. न्यायमूर्ती नागरथना यांनी त्यांच्या 73 पानांच्या निकालात लिहिलं की, "ज्या प्रवृत्तीवर पक्षकार त्यांच्या जोडीदाराची मालमत्ता, स्थिती आणि उत्पन्नाच्या आधारावरून समान पैशांची मागणी करतात त्या प्रवृत्तीवर आमचा गंभीर आक्षेप आहे."

नवऱ्यापासून विभक्त झालेल्या पत्नीचं गरिबीपासून संरक्षण करणे, तिचा सन्मान राखणे आणि सामाजिक न्याय प्रदान करणे हा पोटगीचा उद्देश आहे, असं खंडपीठानं म्हटलंय. खंडपीठाने म्हटले की, “कायद्यानुसार, पत्नीला शक्य त्याच प्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे, जसे ती तिच्या नवऱ्याच्या घरी जगत होती. पण एकदा का पती-पत्नी वेगळे झालेत तर पती सद्यस्थितीनुसार आयुष्यभर पत्नीला साथ देईल असं अपेक्षित नाही.

विभक्त झाल्यानंतर जर पती आयुष्यात चांगले काम करत असेल, तर पत्नीच्या बदलत्या स्थितीनुसार त्याला नेहमी पत्नीचा दर्जा राखण्यास सांगणे त्याच्या वैयक्तिक प्रगतीवर भार टाकणारं आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT