Supreme Court Update google
देश विदेश

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! दहावी पात्रतेच्या नोकरीसाठी पदवीधरांना अर्ज करता येणार नाही?

Job Recruitment Rules Update: सध्या बेरोजगारी वाढत चालली आहे. कमी शिक्षण घेतलेल्यांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. यावरून सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Sakshi Sunil Jadhav

वाढती महागाई पाहता आता कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला कामाला जाणं गरजेचं झालं आहे. काहींना पैशांमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यांच्यासाठी सरकार शिक्षणानुसार कामं (Job) उपलब्ध करून देतं. पण बऱ्याचदा जिथे कमी शिक्षणाची पात्रता असते, तिथे जास्त शिकलेले लोकच कामाला लागतात. यावर आता सरकार मोठं पाऊल उचललं आहे.

काही लोक हे उच्च शिक्षण लपवून कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या पदाच्या नोकरीसाठी अर्ज करतात. सर्वोच्च न्यायालयाने हे निरिक्षण करून हे वागणं बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे बेरोजगारांना आणि कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना कामाच्या संधी मिळत नाहीत. याच कारणामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निरिक्षणात आढळलं आहे.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार, ज्या ठिकाणी नोकरीची पात्रता ही दहावी उत्तीर्ण असेल. तिथे पदांच्या भरती प्रक्रियेत आता पदधीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्यांना अर्ज करता येणार नाही. अशा निकाल दिला आहे. त्यामुळे आता देशात नोकरीचे नियम बदलले जाण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मते, जर सरकारी कामासाठी किंवा कोणत्याही पदासाठी शैक्षणिक पात्रता कमी किंवा जास्त असेल तर त्याचं पालन करणं गरजेचं आहे. कारण उच्च शिक्षण घेतलेला व्यक्ती त्या पदावर जास्त काळासाठी कामं करत नाही. पुढे त्याला नव्या संधी मिळाल्या की, ती व्यक्ती नोकरी सोडते. त्यामुळे ते पद रिक्त राहतं. त्यात वारंवार सरकारी पदे रिक्त होण्याचा धोका वाढतो. असं न्यायालयाच्या निरिक्षणात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT