SC on AAP Office: Supreme Court Order To AAP Political Party To Vacate Delhi Office Till 15 June | Saam TV Political News  Saam TV
देश विदेश

Supreme Court on AAP Office: आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दणका; दिल्लीतील कार्यालय 15 जूनपर्यंत रिकामे करण्याचे आदेश

Delhi's AAP Party Office News: आपचे कार्यालय राऊस ॲव्हेन्यू कोर्टाच्या जमिनीवर कार्यालय बांधले आहे. नवीन जागेसाठी आप अर्ज करुन शकतो, असं कोर्टाने म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

Supreme Court on Delhi's AAP Party Office:

आदमी आदमी पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोर्टाने आम आदमी पक्षाला त्यांचे कार्यालय रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी न्यायालयाने १५ जून पर्यंतची वेळ दिली आहे. राऊस ॲव्हेन्यू परिसरातील आपचे कार्यालय कोर्टाच्या जमिनीवर बांधले आहे. नवीन जागेसाठी आप अर्ज करुन शकतो, असं कोर्टाने म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम आदमी पक्षाने याबाबत सांगितले की, राऊस एव्हेन्यू न्यायालय परिसरात असलेले पक्ष कार्यालय हे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. कारण ही जागा न्यायालय संकुलाच्या विस्तार निश्चित करण्याआधी दिले गेले होते.  (Latest Marathi News)

न्यायालयाने म्हटले आहे की, 'आप'ला दिलेल्या जमिनीवर पक्षाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा न्यायव्यवस्थेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने दिल्ली उच्च न्यायालयाला वाटप केलेल्या भूखंडावर असलेले राजकीय कार्यालय रिकामे करण्यासाठी पक्षाला १५ जूनपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पर्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने लँड अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे पर्यायी जागेसाठी विचारणा करण्याच्या सूचना आम आदमी पक्षाला दिल्या आहेत.

लँड अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला विनंती आहेत की त्यांनी देखील आपच्या अर्जावर तत्काळ विचार करुन चार आठवड्यात निर्णय कळवावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

SCROLL FOR NEXT