Hemant Soren Saam Tv
देश विदेश

Hemant Soren: हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; अंतरिम जामीन नामंजूर, पुढील सुनावणी केव्हा?

Supreme Court Not Granted Bail To Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला नाही.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही मुंबई

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला नाही. आज न्यायालयाने ईडीला नोटीस पाठवली आहे. सोरेन यांना अंतरिम जामीन आणि अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

नियमित जामिनावर सुनावणी होईपर्यंत निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी सोरेन यांनी याचिकेत मागणी केला ( Bail To Hemant Soren) होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. याच खंडपीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. सोरेन यांना अंतरिम जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. परंतु, सर्वेोच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांचा जामीन मंजूर केलेला नाही.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. रांचीतील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. मात्र, अटक होण्याअगोदर काही तास हेमंत सोरेन यांनी (Jharkhand News) पदाचा राजीनामा दिला होता. ते ६ मे रोजी एका दिवसासाठी तुरूंगातुन बाहेर आले होते. ३१ जानेवारी पासून हेमंत सोरेन यांचा मुक्काम तुरूंगातच आहे. त्यांना आजही दिलासा मिळालेला नाही. सोरेन यांचा तुरूंगातील मुक्काम १७ मे पर्यंत वाढला आहे.

आजही त्यांना दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांची जामीन याचिका मंजूर केलेली नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मंजूर (court news) करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता सोरेन यांच्या याचिकेवर १७ मे रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यावेळी त्यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. रांचीतील कथित जमिन घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे. झारखंडमध्ये चार जागांवर मतदान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT