Gyanesh Kumar Saam Tv
देश विदेश

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Gyanesh Kumar Supreme Court Hearing : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीने कारवाई किंवा निलंबनास नकार दिला.

Namdeo Kumbhar

Supreme Court notice to Election Commission over Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांविरोधात आणि निलंबनाच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. ज्ञानेश कुमारांवर तातडीने कारवाई करण्यास कोर्टाने नकार दिला. पण सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस जारी करण्यात आली आहे.

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी "निवडणूक आयोगाची विश्वासार्हता इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे की, देशातील प्रत्येक नागरिक आज स्वतःला असुरक्षित अनुभवत आहे," असा गंभीर युक्तिवाद केला. पण सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्यावर तातडीने कारवाई करण्यास किंवा त्यांना निलंबित करण्यास सध्या नकार दिला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

केंद्र सरकारलाही सुप्रीम कोर्टाची नोटीस:

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीवर आणि 'फॉर्म ६' मध्ये केलेल्या कथित फेरफार प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतच केंद्र सरकारलाही नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे आदेश देण्यास नकार:

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, केवळ न्यूज रिपोर्टच्या (वृत्तपत्रांतील बातम्यांच्या) आधारे कोणताही कायदेशीर आदेश दिला जाऊ शकत नाही. याचिकाकर्त्यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'मधील एका बातमीचा आधार घेऊन न्यायालयात ही याचिका दाखल केली होती.

ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार:

सुप्रीम कोर्टाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून निलंबित करण्याचा कोणताही अंतरिम (तात्पुरता) आदेश देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

याचिकेत नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत? (Gyanesh Kumar Supreme Court Hearing):

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) पदावरून ज्ञानेश कुमार यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले १४ महत्त्वाचे निर्णय रद्द करावेत, अशी मागणी आहे; कारण हे निर्णय 'एकतर्फी' असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका स्वतंत्र न्यायिक तपास आयोगाची (SIT) स्थापना करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काय आरोप आणि मागण्या आहेत?

पटना येथील रहिवासी राकेश कुमार सिंह यांनी ही जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे खालील गोष्टींचे स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली आहे: कायदेशीररीत्या ज्या शक्ती आणि अधिकार संपूर्ण निवडणूक आयोगाचे (Election Commission) आहेत, त्या अधिकारांचा वापर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार एकट्यानेच करत आहेत का? याची पडताळणी सर्वोच्च न्यायालयाने करावी. ज्ञानेश कुमार यांनी जर अशा प्रकारे एकतर्फी अधिकारांचा वापर केला असेल, तर त्यांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर घोषित केले जावेत आणि त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrakor Saree Design: लग्नसमारंभात मिळवा रॉयल मराठमोळा लूक! ट्राय करा चंद्रकोर साडीच्या या ७ हटके डिझाइन्स

Maharashtra News Live Update: रायगडच्या माणगावमध्ये घराचा स्लॅब कोसळून दोन कामगार ठार

Government Scheme : सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 2,000 जमा केल्याने मिळतील 11 लाखांहून अधिक रुपये; पाहा संपूर्ण गणित

मुलींच्या खात्यात थेट ₹1 लाख 1 हजार! लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता अन् कागदपत्रे पाहा

या फोटोमध्ये एकूण किती अंडी आहेत? लवकर सांगा, तुमच्याकडे वेळ आहे फक्त १० सेकंद

SCROLL FOR NEXT