AAP vs LT Governor  Saam tv
देश विदेश

AAP vs LT Governor : आम आदमी पक्षाला मोठा झटका; सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली महानगरपालिकेत नायब राज्यपालांना 'एल्डरमॅन' नियुक्तीची परवानगी

AAP vs LT governor Case Update : आम आदमी पक्षाने मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली महानगरपालिकेत नायब राज्यपालांना 'एल्डरमॅन' नियुक्तीची परवानगी दिली आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आम आदमी पक्षाला मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नायब राज्यपालांना दिल्ली महानगरपालिकेत 'एल्डरमॅन' नियुक्तीची परवानगी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने दिल्लीच्या नायब राज्यपालांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली कॅबिनेटच्या सल्ल्याने नायब राज्यपाल हे महापालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करू शकतात. सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारची याचिका फेटाळत नायब राज्यपालांना दिलासा दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली महानगरपालिकेत (MCD) 10 'एल्डरमॅन' नामनिर्देशित करण्याच्या नायब राज्यपालांच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारची याचिका फेटाळत झटका दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दिल्लीचे नायब राज्यपाल दिल्ली सरकारशी सल्लामसलत न करता महानगरपालिकेत एल्डरमॅनची नियुक्ती करण्यावर कोर्टाने निकाल आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी यावर्षी 1 आणि 4 जानेवारी रोजी आदेश आणि अधिसूचना जारी करून 10 एल्डरमॅन नगरसेवकांची नियुक्ती केली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

'नायब राज्यपालांना व्यापक अधिकार नाहीत, अशी टिपण्णी कोर्टाने आधी झालेल्या सुनावणीवेळी केली होती. अल्डरमॅनला महापालिकेत मतदान करण्याचा अधिकार असल्याने महापौर अस्थिर होण्याची भीती असल्याचं विधान कोर्टाने सुनावणीवेळी केलं होत. या वादामुळे महानगरपालिकेत आजतागायत स्थायी समिती स्थापन झाली नाही. कारण स्थायी समितीच्या निवडणुकीत एल्डरमॅन नावाचे नामनिर्देशित नगरसेवकही मतदान करतात. यावर सुप्रीम कोर्टाची पुन्हा एकदा सुनावणी झाली.

यावेळी सुप्रीम कोर्टाने नायब राज्यपालांना दिलासा देणार निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना महानगरपालिकेत 10 एल्डरमॅन नगरसेवकांची नियुक्ती करण्याची परवानगी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राडा; महिला पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षामध्ये बाचाबाची

मुंब्रा हादरलं! कादर पॅलेसमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; CCTV मध्ये कैद थरारक दृश्य|VIDEO

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

IPL 2026: बटलर-गिलची अर्धशतकी खेळी; गुजरात टायटन्सचा लखनौवर ७ गडी राखून दणदणीत विजय

भोंदूबाबाचा महिलेवर लैंगिक अत्याचार; कौटुंबिक वाद सोडवण्याच्या बहाण्याने घातला ५० लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT