Ballot Paper Voting : बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी याचिकेत एलन मस्क यांच्या वक्तव्याचाही आधार घेतला.
देशात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरने निवडणुका घेण्याची मागणी जनहित याचिका करण्यात आली. ही जनहित याचिका डॉ. केएल पॉल यांची दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश पीबी वराळे यांच्या पीठाने याचिकाकर्त्यांना अनेक प्रश्न विचारले.
याचिकाकर्त्याने एलन मस्क यांच्या वक्तव्याचा आधार देखील घेतला. एलन मस्क यांनी म्हटलं की, 'ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते. याचिकाकर्ता पॉल यांनी म्हटलं की, 'मी लॉस एजेलिन्सला एक संमेलनातून जाऊन आलो. आमच्याजवळ सेवानिवृत्त आयईएस, आयपीएस आणि न्यायाधीश आहेत. त्यांचं समर्थन आहे. सुनावणीदरम्यान, न्यायाधीश विक्रम नाथ यांनी राजकारणात का प्रवेश करत आहात? तुम्ही जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नसल्याचा म्हणता. हरलात तर छेडछाड केल्याचं म्हणता'.
दोन दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेचं कौतुक केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भारतात ६४ कोटी मत एका दिवसांत मोजले जातात. दुसरीकडे अमेरिकेतील अनेक राज्यात अजून मतमोजणी सुरु आहे, या वक्तव्याचा आधार याचिकाकर्त्याने घेतला.
देशातील विरोधी पक्षनेते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हरियाणा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ईव्हीएम ९९ टक्के मशीन चार्ज असल्याचा मुद्दा उचलला. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप लगावण्यात आला.
दरम्यान, शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम मशीवरून महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये 15 टक्के मत महायुतीसाठी सेट केल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी केला. या विरोधात आता नागरिकांनी रस्त्यावर उतरला पाहिजे. पक्ष म्हणून आम्ही निश्चितच न्यायालयामध्ये जाऊ, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
प्रशांत जगताप हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते अजित पवार गटाचे चेतन तुपे यांनी प्रशांत जगताप यांचा 7 हजार मतांनी पराभव केला आहे. विद्यमान आमदारांविरोधात विरोध असतानाही त्यांचा विजय झाला हे संशयास्पद आहे, असेही प्रशांत जगताप म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.