Supreme Court On Hemant Soren Bail Saam Tv
देश विदेश

Hemant Soren: सुप्रीम कोर्टाचा हेमंत सोरेन यांना झटका; नाकारला अंतरिम जामीन

Supreme Court On Hemant Soren Bail : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. कोर्टाने सोरेन यांचा जामीन नाकारला. दरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर सोरेन यांच्या वकिलांनी याचिका मागे घेतलीय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी सोरेन यांच्याकडून करण्यात आली होती.

जामीन नाकारल्यामुळे कथित जमीन घोटाळ्यात अटकेत असलेले हेमंत सोरेन हे लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा प्रचार करू शकणार नाहीत. दरम्यान सोरेन यांना ३१ जानेवारीला ईडीने अटक केली होती. ईडीने केलेल्या अटकेलादेखील त्यांनी कोर्टात आव्हानं दिल होत, मात्र कोर्टाने तीही याचिका फेटाळली होती.

जामीन अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांना सुनावले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्याची वस्तुस्थिती लपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर नाराजी दर्शवलीय. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सोरेन यांच्यावर नाराजी व्यक्त केली. 'तुमचे वागणे खूप काही सांगतं, तुमचा क्लायंट स्पष्टपणे पुढे येतील ,अशी आम्हाला अपेक्षा होती पण तुम्ही महत्त्वाची तथ्ये लपवली.' असल्याचं कोर्टानं सोरेनची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांना सुनावलं आहे.

वस्तुस्थिती लपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका मागे घेतली. सोरेन हे तुरुंगात आहेत, कोर्टात दाखल होणाऱ्या याचिकांबद्दल त्यांना माहिती नाही, असं म्हणत सिब्बल यांनी सोरेन यांचा बचाव केला. यावर खंडपीठाने म्हटलं की, 'तुमचे आचरण निष्कलंक नाहीये.' सोरेन हे सामान्य व्यक्ती नाहीत, असेही खंडपीठाने म्हटलंय. याआधी ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, झारखंड उच्च न्यायालयाने सोरेनची अटक कायम ठेवली होती. तसेच सोरेने यांची जामीन याचिका १३ मे रोजी ट्रायल कोर्टाने फेटाळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: मेकअप करताना 'या' ७ चुका टाळा! नाहीतर फ्लॉलेस लूकऐवजी चेहरा दिसेल विचित्र

Silk Saree: महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, या 8 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Society Rules : घराबाहेर, लिफ्टसमोर चपलांचा रॅक ठेवणे पडेल महाग! सोसायट्यांचा कडक नियम; पाहा काय सांगतो कायदा!

SBI ग्राहकांनो, सावधान! UPI-IMPS-YONO अचानक बंद; बँकेने दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

SCROLL FOR NEXT