indian Railway Court News  AI Image
देश विदेश

Railway News : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वेचं तिकीट महागणार

Railway Vima Update News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सुप्रीम कोर्टाने काउंटरवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनाही विमा संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम २७ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत.

Alisha Khedekar

  • रेल्वे आरक्षण काउंटरवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनाही विमा मिळणार

  • सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला महत्त्वाचे आदेश दिले आहेत

  • हे निर्देश येत्या २७ ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत

  • या निर्णयाचा काउंटर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

तुम्हीसुद्धा रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आता रेल्वे स्थानकांवरील आरक्षण काउंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांप्रमाणे प्रवासी विमा द्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने रेल्वेला दिले आहेत. हा नियम २७ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, आदेशाच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा झाल्यास रेल्वे बोर्डावर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणी सुरु असताना प्रवाशांच्या विमा संरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. ही सुनावणी न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुरू होती.

सध्या IRCTC च्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवाशांना प्रवास विम्याचा पर्याय दिला जातो. मात्र, रेल्वे तिकीट काउंटरवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध नसल्याने न्यायालयाने मुद्दा उपस्थित केला. सर्व प्रवाशांना समान विमा संरक्षण मिळावे, यासाठी काउंटर तिकिटांचाही विमा योजनेत समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१७ फेब्रुवारी २०२४ पासून ऑनलाइन प्रवास विम्यासाठी एका प्रवासीमागे करासह ४५ पैसे इतका प्रीमियम आकारला जात आहे. मात्र, काउंटरवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठीही हाच प्रीमियम लागू होणार की स्वतंत्र शुल्क आकारले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. तसेच विमा घेण्याची प्रक्रिया कशी असेल, याची अधिकृत माहिती रेल्वेकडून मिळणे बाकी आहे.

सध्याच्या ऑनलाइन विमा योजनेनुसार, रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण दिव्यांगत्व आल्यास १० लाख रुपये आणि कायमस्वरूपी अंशतः दिव्यांगत्व आल्यास ७.५ लाख रुपये विमा संरक्षण मिळते. जखमी प्रवाशांच्या रुग्णालयातील उपचारांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत, तर मृतदेह वाहतुकीसाठी १० हजार रुपयांपर्यंतची तरतूद आहे. हे लाभ पॉलिसीच्या अटी व पात्रतेनुसार मिळतात. दरम्यान, रेल्वे रुळांजवळ कुंपण, पादचारी पूल आणि ‘कवच’ सुरक्षा प्रणाली यांसारख्या उपाययोजनांचाही न्यायालयाने आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reservation: 'हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारल्यास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही', सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Weight Loss Tips: वजन कमी करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, चालताना या 6 गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या

Heart blockage: ब्लड प्रेशर नॉर्मल असलं तरी हृदयात ब्लॉकेज असू शकतात? या 6 टेस्ट सांगतील हार्ट अटॅकचा धोका!

Maharashtra News Live Update: महायुती-महाविकास आघाडीत मित्रपक्षांमध्ये बिघाडी

राहुल गांधींवर सुप्रीम कोर्ट भडकले, थेट बजावली नोटीस; म्हणाले, 'न्यायव्यवस्थेवर कोणीही दबाव टाकू शकत नाही'

SCROLL FOR NEXT