Supreme Court of India building as a landmark judgment allows caste certificates based on mother’s caste. Saam tv
देश विदेश

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

Supreme Court On Caste Certificate : सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे आता मुलांना आईच्या जातीवरून जातप्रमाणपत्र मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. मात्र वडीलांऐवजी आईच्या जातीवरून जातप्रमाणपत्र कसं मिळू शकतं? नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्राबाबत ऐतिहासिक निर्णय दिला.

  • वडील अनुसूचित जातीचे नसतानाही आईच्या जातीवरून मुलीला प्रमाणपत्र मंजूर.

  • आंतरजातीय विवाहातील मुलांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय

जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय. वडील अनुसुचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर एका मुलीला अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे यापुढे आईच्या जातीच्या आधारावर मुलांना जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगलीय. मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात.

जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

आईच्या अनुसूचित जातीच्या आधारावर मुलीला SC प्रमाणपत्र

वडील अनुसूचित जातीचे नसतानाही मुलीला SC प्रमाणपत्र

शैक्षणिक गरजा विचारात घेऊन निकाल

सध्या जात प्रमाणपत्रासाठी वडिलांची जात आणि निवासस्थान मुख्य आधार

वडिलांची जात वारसा हक्काने मिळते, याविरोधातील याचिका प्रलंबित

विशेष म्हणजे मुलांना वडिलांची जात वारसा हक्काने मिळते या नियमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर अद्याप निर्णय बाकी असताना, कोर्टानं हा निकाल दिलाय..सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर देशभरात जात प्रमाणपत्र, आरक्षण आणि आंतरजातीय विवाह यासंबंधातील अधिकारांवरून नव्यानं चर्चा सुरू झालीय. मात्र भविष्यात कोर्टाने आईच्या जातीलाही निर्णायक आधार मानला तर देशातील सामाजिक न्याय व्यवस्थेत मोठे बदल घडून येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्या निलंबनाची मागणी, विधानपरिषदेत लक्षवेधी

Crime : लाथाबुक्क्यांनी मारलं, चाकूने वार केला, अहिल्यानगरमध्ये पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या कामाची बातमी! eKYC करतानाची ही चूक पडेल महागात; ₹१५०० बंद होणार

New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग, कल्याण ते लातूर प्रवास फक्त ४ तासांत; काय आहे सरकारचा प्लान?

"बाबुराव को गुस्सा क्यू आता है"? पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणखी एक व्हिडिओ अन् पुन्हा गुन्हा, वाचा प्रकरण

SCROLL FOR NEXT